अग्निशमन दलाच्या पदभरतीचा मार्ग मोकळा | पुढारी

अग्निशमन दलाच्या पदभरतीचा मार्ग मोकळा

पुणे, पुढारी वृत्तसेवा: महापालिकेच्या अग्निशमन दलाचा आकृतिबंध निश्चित झाल्यानंतर आता राज्य शासनाने सेवा प्रवेश नियमावलीलाही नुकतीच मान्यता दिली आहे. त्यामुळे दलात पदांची भरती करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. अग्निशमन दलाच्या मुख्य कार्यालयासह शहरातील इतर 13 उपप्रादेशिक कार्यालयांत मोठ्या प्रमाणात कर्मचार्‍यांची कमतरता आहे.

अनेकदा कर्मचार्‍यांच्या साप्ताहिक सुटीच्या दिवशी अनेक केंद्रांवर अवघे दोन ते तीन फायरमन कार्यरत असतात. त्यामुळे कर्मचार्‍यांच्या मदतीसाठी अनेकवेळा कंत्राटी पद्धतीने कर्मचार्‍यांची नियुक्ती केली जात होती. कार्यदेशक (वाहन), सीनिअर रेडिओ टेक्निशिअन, अधीक्षक, उपअधीक्षक आणि शिपाई ही सहा पदे पूर्ण क्षमतेने भरलेली असून, तेथे केवळ सात जणच कार्यरत आहेत.

उर्वरित 22 पदांसाठी 903 जागा उपलब्ध असल्या, तरी तेथे सध्या 393 जण काम करीत असून, 510 जागा रिक्त आहेत. सध्या केवळ 383 कर्मचारी कार्यरत आहेत. अग्निशमन दलाचा आकृतिबंध निश्चित केला होता. मात्र, सेवा प्रवेश नियमावली मंजूर केलेली नव्हती. त्यामुळे विभागातील तब्बल 55 टक्के पदे रिक्त होती. अखेर, राज्य शासनाने सेवा प्रवेश नियमावलीस मान्यता दिली आहे.

निराशेतून ‘टार्गेट किलिंग’; मंत्री प्रकाश जावडेकर

नियमावलीत मुख्य अग्निशमन अधिकारी हे पद 100 टक्के पदोन्नतीने भरता येणार आहे, तर उपमुख्य अग्निशमन अधिकारी हे पद 50 टक्के पदोन्नतीने, तर विभागीय अग्निशमन अधिकारी, सहायक विभागीय अग्निशमन अधिकारी, उप अग्निशमन अधिकारी, यंत्रचालक या पदांपैकी 75 टक्के पदे पदोन्नतीने भरली जाणार आहेत. तर, काही पदे 100 टक्के पदोन्नतीने भरता येणार आहेत.

रिक्त असलेली पदे

सहायक अग्निशमन अधिकारी 18
उप अग्निशमन अधिकारी 17
रुग्णवाहिकाचालक 37
तांडेल 47
यंत्रचालक 152
फायरमन 198

हेही वाचा

राष्‍ट्रपती निवडणूक : संयुक्‍त उमेदवार देण्‍याबाबत सोनिया गांधी सकारात्‍मक

जुन्या सांगवीमध्ये रस्त्याचे काम संथगतीने पावसाळा तोंडावर असताना कामे पूर्ण होणार का?

फरदीन खानचे पुनरागमन

Back to top button