शाळा व्यवस्थापन समिती बैठकीसाठी विनोबा; अ‍ॅप मासिक बैठका होणार ऑनलाइन | पुढारी

शाळा व्यवस्थापन समिती बैठकीसाठी विनोबा; अ‍ॅप मासिक बैठका होणार ऑनलाइन

पुणे, पुढारी वृत्तसेवा: पुणे जिल्ह्यातील शाळांच्या व्यवस्थापन समितीच्या बैठकीसाठी विनोबा हे अ‍ॅप तयार करण्यात आले आहे. या अ‍ॅपच्या माध्यमातून ऑनलाइन तसेच ऑफलाइन बैठका घेण्यात येणार आहेत. बैठकीचा अहवाल अ‍ॅपमध्येच भरण्यात यावा, अशा सूचना जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेच्या प्राचार्य डॉ. शोभा खंदारे यांनी पुणे जिल्ह्यातील प्रशासकीय अधिकार्‍यांना दिल्या आहेत.

डॉ. खंदारे यांनी दिलेल्या सूचनांनुसार, शाळा व्यवस्थापन आणि विकास समिती बैठक जूनच्या दुसर्‍या किंवा तिसर्‍या आठवड्यात आयोजित करावी. बैठकांचे आयोजन हे ऑनलाईन आणि ऑफलाईन करावे. सर्व मुख्याध्यापकांनी विनोबा अ‍ॅप डाउनलोड करून नोंदणी करावी. बैठक संपल्यानंतर मासिक बैठकीचा अहवाल व इतिवृत्त फोटोसह अ‍ॅपमध्ये अपलोड करावे.

मुळा पाणीप्रश्नी 14 पासून किसान सभेचा सत्याग्रह

क्षेत्रीय अधिकारी व विषय साधन व्यक्ती यांनी शाळा व्यवस्थापन समिती, शाळा व्यवस्थापन आणि विकास समितीच्या बैठकीत सहभाग घ्यावा. या महिन्यातील बैठक यापूर्वी झालेली असेल तरी विनोबा अ‍ॅपमध्ये माहिती भरावी. बैठकीत पटनोंदणीबाबतचा आढावा घेणे, शाळापूर्व तयारी अभियानअंतर्गत शाळा स्तरावरील दुसरा मेळावा आयोजित करणे, विद्यार्थ्यांच्या स्वागताची तयारी करणे, शाळापूर्व तयारी दुसरा टप्पा नियोजन करणे, पटनोंदणीसाठी शाळाबाह्य मुलाचे सर्वेक्षण,

शालेय वार्षिक नियोजन आराखड्यास मान्यता, विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तावाढीसाठी नावीन्यपूर्ण उपक्रमांचे नियोजन करणे, अल्पकालीन व दीर्घकालीन गरजांचा आराखडा निश्चित करणे, शाळेच्या भौतिक व शैक्षणिक विकासाबाबत चर्चा करणे, शाळा व्यवस्थापन समितीची मुदत संपली असल्यास शासन निर्णयानुसार समिती पुनर्गठित करणे या विषयांवर चर्चा करण्यात यावी, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

हेही वाचा 

विद्यार्थी घेणार मोकळा श्वास; मास्कसक्ती नाही, शिक्षकांचे दोन्ही डोस पूर्ण

‘भाईजान’ मध्ये पलक तिवारी

सोलापूर : बार्शीत पोलीसाला मारहाण; दोघांवर गुन्हा दाखल

Back to top button