भागीदारीच्या आमिषाने साडेपाच लाखांची फसवणूक, गुन्हा दाखल | पुढारी

भागीदारीच्या आमिषाने साडेपाच लाखांची फसवणूक, गुन्हा दाखल

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा:  व्हॉट्सअ‍ॅपद्वारे चॅटिंग करत वडिलांच्या पेट्रोलियम व्यवसायात भागीदारी देण्याचे आमिष दाखवून आणि इन्शुरन्सचे पैसे पाठविण्यास भाग पाडून एकाची 5 लाख 55 हजार रुपयांची फसवणूक केली. ही घटना मे ते ऑगस्ट 2021 दरम्यान मोशीत घडली.

सावेडीतून 41 तोळे लंपास, भिस्तबाग परिसरात जबरी घरफोडी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, धनंजय रामचंद्र सावंत (वय 38, रा. केसर ट्रि टाउन, मोशी) यांनी भोसरी एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार रोझ मोर्गन या नावाने चॅटिंग करणार्‍या अनोळखी व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रोझ या नावाने व्हॉटस्अ‍ॅपवर फिर्यादी सावंत यांच्याशी चॅटिंग केली.

खरेदी-विक्रीत 14 लाखांची फसवणूक भिंगार कॅम्प पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

रोझने वडिलांच्या पेट्रोलियम व्यवसायात भागीदारी देण्याचे आमिष फिर्यादी सावंत यांना दाखविले.या व्यवसायासाठी इन्शुरन्सचे पैसे मंगल सिंग या व्यक्तीच्या मुंबईतील युनियन बँकेच्या खात्यात 5 लाख 55 हजार रुपये पाठविण्यास भाग पाडले. फिर्यादीस व्यवसायात भागीदारी तर दिलीच नाही, मात्र पैसेदेखील परत दिले नाहीत. त्यामुळे फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी पोलिसात तक्रार दिली. एमआयडीसी पोलिस अधिक तपास करत आहेत.

Back to top button