खरेदी-विक्रीत 14 लाखांची फसवणूक भिंगार कॅम्प पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल | पुढारी

खरेदी-विक्रीत 14 लाखांची फसवणूक भिंगार कॅम्प पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

जेऊर : पुढारी वृत्तसेवा : टाटा हॅरिअर कार 14 लाख रुपयांना विकून त्याची कागदपत्रे न देता, तसेच ती कार परत घेऊन त्याबदल्यात नादुरुस्त ऑडी देऊन 14 लाखांची फसवणूक केल्याप्रकरणी भिंगार कॅम्प पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आंबेगावच्या उत्तर भागात मुसळधार पाऊस; शेतीची कामे ठप्प

मोहम्मद असीफ मोहम्मद हनीफ शेख (रा. न्यु निलम बेकरी, आंबेडकर चौक, मनमाड, ता. नांदगाव, जि. नाशिक व वसीम मोहम्मद सादिक शेख (रा. बंगला न 17, पखाल रोड, भगवती मिल, नाशिक) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. जमीर मुस्ताक शेख (वय 34, रा. मुकुंदनगर) यांनी फिर्याद दिली आहे.

कर्नाटक : विधान परिषदेच्या चारही जागा जिंकू; मुख्यमंत्री बोम्मई

13 जुलै 2020 ते 8 जून 2022 या कालावधीत हा प्रकार घडला आहे. आरोपींनी टाटा हॅरीअर कार (एमएच 41 एएस 9786) 14 लाख रूपयांना विकून फिर्यादीला तिची कागदपत्रे न देता फसवणूक केली. फिर्यादीकडून ती कार पुन्हा घेवून ती दुसर्‍याच्या नावावर केली व फिर्यादीला 14 लाख रूपये परत न करता, त्या बदल्यात नादुरुस्त ऑडी कार (एमएच 14 एफएस 0099) देऊन व्यवहारात 14 लाख रुपयांची फसवणूक केल्याचा अर्ज पोलिस ठाण्यात देण्यात आला होता. या अर्जावर चौकशी होऊन सरकारी वकिलांचा अभिप्राय घेऊन पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

Back to top button