आंबेगावच्या उत्तर भागात मुसळधार पाऊस; शेतीची कामे ठप्प | पुढारी

आंबेगावच्या उत्तर भागात मुसळधार पाऊस; शेतीची कामे ठप्प

महाळुंगे पडवळ; पुढारी वृत्तसेवा: आंबेगावच्या उत्तर भागातील साकोरे, महाळुंगे, चास आदी गावांमध्ये पूर्वमोसमी मुसळधार पाऊस पडला. त्यामुळे शेतकरी सुखावला. ऊस, मका आदी पिकांना हा पाऊस उपयुक्त ठरणार असल्याचे मत शेतकर्‍यांनी व्यक्त केले. या पावसाने शेतीची कामे मात्र ठप्प झाली आहेत.

साकोरे, गाडेपट्टी येथे बुधवार, गुरुवार आणि शुक्रवार असा सलगा तीन दिवस मुसळधार पाऊस पडला. शनिवारी (दि. 11) दुपारी तीन वाजेच्या सुमारास देखील मुसळधार पाऊस झाला. यामुळे शेतामध्ये पाणी साचले होते. या पावसाने ऊस, ज्वारी, शाळू, मका पडला.

रस्ते जलमय झाले होते, तर जनावरांसाठी आवश्यक असलेला चारा काढता आला नाही, असे शेतकर्‍यांनी सांगितले. विजांचा कडकडाट व मेघगर्जनेसह पावसाच्या सरी पडत होत्या. सर्वत्र पाणीच पाणी दिसत होते. शेतात वापसा नव्हता. शेतीची कामे ठप्प झाल्याने गेल्या अनेक दिवसांनंतर शेतकर्‍यांनी घरामध्ये राहणे पसंत केले.

हेही वाचा 

पिंपरखेड परिसरात जोरदार पाऊस, पिके भुईसपाट

चोरीच्या घटनेनंतर तब्बल 22 दिवसांनी विद्युत पंप चोरीचा गुन्हा

पहिल्याच पावसाने जामखेडमध्ये बत्ती गूल

Back to top button