

ओतूर; पुढारी वृत्तसेवा : मासेमारी करण्यासाठी गेलेले दोघेजण अचानक बोट उलटल्याने धरणात बुडाले. अणे-माळशेज महामार्गालगत असलेल्या पिंपळगाव जोगा धरणात ही घटना घडली. यामध्ये एकाचा बुडून मृत्यू झाला, तर एक जण पोहून बाहेर आल्याने बचावला. सुभाष बिश्वास व मिलान बिश्वास अशी या दोघांची नावे आहेत. हे दोघेजण बुडाल्यानंतर त्यातील मिलानचा मृत्यू झाला, तर सुभाष बिश्वास हा पोहत बाहेर पडला. ही घटना गुरुवारी (दि. ९) सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास घडली.
मिलान बिश्वास याचा मृतदेह तब्बल ३६ तासांनी शनिवारी (दि. ११) सापडला. मदतकार्यात जुन्नर आपत्ती व्यवस्थापन संघाचे प्रशांत कबाडी, रूपेश जगताप, राजकुमार चव्हाण, संकेत बोंबले, आदित्य आचार्य, अमोल जाधव, सुनील शिंदे, मनोहर केदार, संकेत कबाडी यांनी शर्तीचे प्रयत्न केले. याबाबत ओतूरचे सहायक पोलिस निरीक्षक परशुराम कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली तळपाडे तपास करीत आहेत.
हेही वाचा