शंभर टन ऊस उत्पादनाबाबत कृषी विभागांतर्गत कार्यशाळा | पुढारी

शंभर टन ऊस उत्पादनाबाबत कृषी विभागांतर्गत कार्यशाळा

वरकुटे बुद्रुक, पुढारी वृत्तसेवा: वरकुटे बुद्रुक (ता. इंदापूर) येथे एकरी शंभर टन ऊस उत्पादनाबाबत कृषी विभागांतर्गत कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. मंडळ कृषी अधिकारी बाळासाहेब कोकणे यांनी उपस्थित शेतकर्‍यांना मार्गदर्शन केले.

ऊस लागवड तंत्रज्ञान, सुपर केन नर्सरी निर्मिती, कमी खर्चात उत्पादन, जमिनीची पूर्वमशागत, पायाभूत बेणे वापरणे, हिरवळीच्या खतांचा वापर, हुमणी नियंत्रण, बेणे प्रक्रिया, सेंद्रिय व जैविक खतांचा वापर, जीवामृत, शेण स्लरीचा वापर, फुटव्यांचे व्यवस्थापन, ठिबक सिंचन व फर्टिगेशनचा वापर, एकात्मिक खत व कीड नियंत्रण याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.

माती परीक्षण व आवश्यकतेनुसार खत टाकण्याचे आवाहन त्यांनी केले.कार्यक्रमासाठी इंदापूर सहकारी साखर कारखान्याचे संचालक प्रवीण देवकर, सुनील शिंदे, तानाजी गायकवाड, विजय बालगुडे, कृष्णाजी देवकर आदी शेतकरी उपस्थित होते. एसव्ही अग्रोचे संचालक विलास करे यांनी सेंद्रिय शेतीविषयी मार्गदर्शन केले. कृषी सहाय्यक हनुमंत बोडके यांनी कृषी विभागाच्या योजना सांगितल्या.

हेही वाचा 

Dhule Crime : पुण्याच्या व्यापाऱ्यांकडून 40 लाख रुपये लुटणाऱ्या दोघा भामट्यांना बेड्या

प्रकल्पग्रस्त जमीन वाटपाचे संकलन सुरू

 

Back to top button