सांगवीतील पिकांना कालव्याच्या पाण्याचा आधार; पावसाची अद्यापही प्रतीक्षाच | पुढारी

सांगवीतील पिकांना कालव्याच्या पाण्याचा आधार; पावसाची अद्यापही प्रतीक्षाच

सांगवी, पुढारी वृत्तसेवा: यंदा कडक उन्हाळ्यामुळे पिके जळून नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. जून महिन्याच्या सुरुवातीला बारामती तालुक्यातील सांगवी परिसरात थोडासा पाऊस झाला होता. मात्र तो पुरेसा नसल्याने पिकांना कालव्याच्या पाण्याचा आधार मिळाला आहे.

सांगवी भागात दरवर्षीपेक्षा यंदा अतिशय कडक उन्हाळ्यामुळे शेतातील उभी पिके पाण्यावाचून जाळण्याच्या मार्गावर आहेत.सध्या या भागातील पिके वाचविण्यासाठी मान्सूनपूर्व मोठ्या पावसाची प्रतीक्षा आजही कायम आहे.

ऐन पावसाळ्यातील काही दिवस उलटले तरी समाधानकारक मोठा पाऊस झाला नाही. सुदैवाने या भागातील शेतीसाठी निरा डाव्या कालव्याचे आवर्तन सुरू आहे. त्यामुळे पिकांना एकप्रकारे आधार मिळाला आहे.

Hardeek-Akshaya : राणादा-पाठकबाईं व्हेकेशन टूरवर, रोमँटिक फोटो व्हायरल

सांगवी परिसरातील बहुतांश शेतकर्‍यांनी उसासारखी पिके घेतली आहेत. यंदा निरा डावा कालवा व निरा नदीच्या पाण्यामुळे शेतीच्या पाण्याची टंचाई जाणवली नाही. मात्र निरा डाव्या कालव्याच्या वितरिका क्र.18 ला काही तांत्रिक कारणांमुळे आवर्तन लांबणीवर गेले होते.

त्यामुळे या कार्यक्षेत्रात पाणीटंचाईची झळ बसून पिके संकटात सापडली होती. सध्या सुरू असलेल्या आवर्तनामुळे शेतातील उभ्या पिकांना काहीसा आधार मिळणार आहे.

Back to top button