पिंपरी: लग्न समारंभात काढलेल्या व्हिडीओच्या कारणावरून अल्पवयीन मुलाला बेदम मारहाण | पुढारी

पिंपरी: लग्न समारंभात काढलेल्या व्हिडीओच्या कारणावरून अल्पवयीन मुलाला बेदम मारहाण

पिंपरी : लग्न समारंभात काढलेल्या व्हिडीओच्या कारणावरून अल्पवयीन मुलाला बेदम मारहाण केली. त्यानंतर पोलिसात तक्रार केली तर घरात घुसून मारीन अशी धमकी दिली. ही घटना बुधवारी (दि. 8) सकाळी आठच्या सुमारास संतोषीमाता मंदिर, आळंदी येथे घडली. चैतन्य लक्ष्मण पांचाळ (17, रा. केळगाव, ता. खेड) यांनी आळंदी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

त्यानुसार, दोन अल्पवयीन मुलांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी हे त्यांच्या आईला संतोषी माता मंदिर आळंदी येथे सोडून घरी जात होते. त्यावेळी आरोपींनी त्यांना अडवले. त्यांना लोखंडी पट्टीने मारहाण केली.

Back to top button