

पिंपरी : विवाहितेच्या छळ प्रकरणी सासरच्या पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार 29 जुलै 2021 ते 8 जून 2022 या कालावधीत केशवनगर, चिंचवड येथे घडला.
पती रवींद्र कणसे (वय 25), सासू लतिका रवींद्र कणसे, नणंद राजश्री योगेश पवार (तिघे रा. चिंचवड), अश्विनी पाटील (रा. सातारा), कल्याणी सागर ढाणे (रा. रावेत) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पीडित विवाहितेने चिंचवड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.आरोपींनी आपसात संगनमत करून फिर्यादी यांना 'तुला स्वयंपाक येत नाही. तुला फक्त खायलाच लागते' असे बोलून मारहाण केली. तसेच, किरकोळ कारणावरून फिर्यादीचा शारीरिक व मानसिक छळ केला.