पुणे म्हाडातर्फे 5069 सदनिकांची नोंदणी सुरु | पुढारी

पुणे म्हाडातर्फे 5069 सदनिकांची नोंदणी सुरु

पुणे, पुढारी वृत्तसेवा: पुणे गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळातर्फे (म्हाडाचा घटक) पुणे, सोलापूर व कोल्हापूर जिल्ह्यातील विविध गृहनिर्माण योजनेतील 5 हजार 69 सदनिकांच्या विक्रीकरिता ऑनलाईन अर्ज नोंदणी व अर्ज भरणा प्रक्रियेचा शुभारंभ गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या हस्ते आज ’गो – लाईव्ह’ कार्यक्रमांतर्गत करण्यात आला.

सदनिकांच्या वितरणाकरिता प्राप्त अर्जांची संगणकीय सोडत दिनांक 29 जुलै, 2022 रोजी सकाळी 10.00 वाजता पुण्यातील पुणे मंडळाच्या गृहनिर्माण भवन, आगरकर नगर येथील कार्यालयात काढण्यात येणार आहे. मंत्रालयातील उपमुख्यमंत्री कार्यालयाच्या समिती सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाला सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे, पुणे मंडळाचे मुख्य अधिकारी नितीन माने, म्हाडाच्या मुख्य माहिती व संचार तंत्रज्ञान अधिकारी सविता बोडके, म्हाडाचे मिळकत व्यवस्थापक विजय ठाकूर आदी उपस्थित होते.

धुळे : पोटनिवडणूक जिंकल्याच्या रागातून दाम्पत्याला मारहाण

यावेळी गृहनिर्माण मंत्री डॉ. आव्हाड यांच्या हस्ते सदनिका सोडतीसंदर्भातील माहिती पुस्तिकेचे अनावरण करण्यात आले. सोडत प्रक्रियेत सहभाग घेण्याकरिता नियमावली , मार्गदर्शक सूचना या पुस्तिकेत नमूद करण्यात आल्या आहेत. म्हाडाच्या अधिकृत संकेतस्थळावर इच्छूक अर्जदारांकरिता उपलब्ध करून देण्यात आली आहे. सर्व इच्छूक अर्जदारांनी अर्ज नोंदणी व अर्ज भरणा करण्याआधी या माहिती पुस्तिकेचे अवलोकन करण्याचे आवाहन पुणे मंडळातर्फे करण्यात आले आहे.

सोडतीत 20 टक्के सर्वसमावेशक गृहनिर्माण योजनेअंतर्गत एकूण 1945 सदनिकांचा सोडतीत समावेश असून पुणे महानगरपालिकेच्या हद्दीत 575 सदनिका, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या हद्दीत 1370 सदनिका, म्हाडा गृहनिर्माण योजनेअंतर्गत 279 सदनिका, प्रधानमंत्री आवास योजनेतील 170 सदनिका विक्रीसाठी उपलब्ध आहेत. तसेच म्हाडा गृहनिर्माण योजनेतील प्रथम येणार्‍यास प्रथम प्राधान्य या योजनेअंतर्गत 2 हजार 675 सदनिका विक्रीसाठी सोडतीत उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

ठाणे : पहिल्या पावसातच ठाण्यात सहा वृक्ष उन्मळून पडले

 असा करा अर्ज

नोंदणीकृत अर्जदार दिनांक 10 जून, 2022 रोजी सकाळी 10 वाजेपासून ऑनलाईन अर्ज करू शकतील. दिनांक 10 जुलै, 2022 रोजी रात्री 11.59 वाजेपर्यंत अर्जदारांना ऑनलाईन अर्ज सादर करता येणार आहे. दिनांक 11 जुलै, 2022 रात्री 11.59 पर्यंत ऑनलाइन अनामत रक्कमेची स्वीकृती केली जाणार आहे. दिनांक 12 जुलै, 2022 रोजी संबंधित बँकेच्या कार्यालयीन वेळेपर्यंत अनामत रकमेचा भरणा अर्जदारांना करता येईल. सोडतीसाठी स्वीकृत अर्जांच्या अंतिम यादीची प्रसिद्धी दिनांक 21 जुलै, 2022 रोजी सायंकाळी 6.00 वाजता म्हाडाच्यासंकेतस्थळावर केली जाणार आहे.

                                       -नितीन मानेपाटील, पुणे मंडळाचे मुख्य अधिकारी

Back to top button