

पुणे : पुढारी वृत्तसेवा
गेल्या काही दिवसांत कोरोनाची रुग्णसंख्या वाढत असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. तर दुसरीकडे प्रशासनही सतर्क झाले आहे. जिल्ह्यातील दुसरा डोस घेण्यासाठी पात्र नागरिकांचा शोध घेऊन त्यांचे लसीकरण केले जात आहे. गेल्या सात दिवसांत एक लाख 41 हजार 61 घरांना भेट देऊन 13 हजार 926 जणांना दुसरा डोस दिला. दक्षता (प्रिकॉशन) डोससाठी पात्र असलेल्या सहा हजार 953 आणि इतर दोन हजार 779 जणांचे लसीकरण करण्यात आले.
कोरोनाच्या रुग्णांवर लक्ष ठेवण्यासाठी चाचण्या वाढविण्यात येत असून, पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्यास त्याच्या संपर्कातील व्यक्तींचा शोध घेऊन त्यांच्या चाचण्या करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच, इन्फ्लूएंझासदृश आजार किंवा ताप आणि अतितीव्रश्वसनमार्ग आजार संसर्ग (सारी) याबाबतच्या रुग्णांचे सर्वेक्षण करण्यात यावे, अशा सूचना जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी आरोग्य विभागाला दिल्या होत्या, त्यानुसार जिल्ह्यात सर्वेक्षण सुरू करण्यात आले आहे.
जिल्ह्यात सध्या साडेसहा लाख लाभार्थी दुसर्या डोसपासून दूर आहेत. त्यांचे लसीकरण येत्या महिन्यात पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले. हर घर दस्तक मोहिमेसाठी ग्रामीण भागात 773, तर पुणे शहरात 55 टीमद्वारे सर्वेक्षण केले जात आहे. त्यामध्ये दुसरा डोस घेण्यासाठी पात्र असलेल्या 13 हजार 926 जणांना लस देण्यात आली. त्याबरोबरच 12 ते 14 वयोगटातील 1 हजार 288 जणांना पहिला आणि 1 हजार 491 जणांना दुसरा डोस दिला. तर 6 हजार 953 जणांना दक्षता (प्रिकॉशन) डोस देण्यात आला आहे. लस घेतलेल्या नागरिकांच्या घरी भेटी देऊन त्यांना लस घेण्यास प्रवृत्त करा, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.
विभाग अपेक्षित लाभार्थी पहिला डोस दुसरा डोस
ग्रामीण 211975 224985 137844
पुणे शहर 172828 114745 73828
पिं.चिं. शहर 116700 70546 48439
पुणे ग्रामीण 372888
पुणे शहर 105663
पुणे ग्रामीण 113388 101647
पुणे शहर 95730 142031
पिं.चिं. शहर 56355 –
ग्रामीण भागात हर घर दस्तक मोहिमेत 773 टीम सर्वेक्षण करीत असून, एका टीममध्ये चार जणांचा समावेश आहे. दुसर्या डोससाठी पात्र असलेल्या नागरिकांना जवळच्या लसीकरण केंद्रावर नेऊन लस दिली जात आहे. जुलैअखेरपर्यंत दुसर्या डोससाठी शिल्लक असलेल्या नागरिकांचे लसीकरण पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे.
– डॉ. भगवान पवार, जिल्हा आरोग्य अधिकारी, जि. प. पुणे.