पिंपरी: लघुशंकेसाठी थांबलेल्या ट्रक चालकाला लुटणार्‍या सात जणांना अटक | पुढारी

पिंपरी: लघुशंकेसाठी थांबलेल्या ट्रक चालकाला लुटणार्‍या सात जणांना अटक

पिंपरी : लघुशंकेसाठी थांबलेल्या ट्रक चालकाला लुटणार्‍या सात जणांच्या टोळक्याने पोलिसांनी अटक केली आहे. ही घटना 3 जून रोजी पहाटे साडेचार वाजता पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर घडली. संकेत सर्जेराव कांबळे (21, रा. पनवेल, जि. रायगड), अमोल संभाजी गोपाळे (26, रा. शिरगाव, ता. मावळ), अक्षय राजू शेळके (21, रा. सोमाटणे फाटा, ता. मावळ), प्रकाश श्रीरंग साळुंके (23, रा. सोमाटणे फाटा, ता. मावळ), प्रिन्स लालजी यादव (21, रा. सोमाटणे फाटा, ता. मावळ), प्रसाद ज्ञानेश्वर कानगुडे (19, रा. सोमाटणे फाटा, ता. मावळ), राजा गंगाधर बाग (21, रा. गणेशनगर, ता. मावळ) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.

याप्रकरणी सुरेश नानूराम प्रजापती (26, रा. राजस्थान) यांनी शिरगाव चौकीत फिर्याद दिली आहे. फिर्यादी प्रजापती हे ट्रक चालक आहेत. दरम्यान, 3 जून रोजी ते त्यांच्या ताब्यातील ट्रक घेऊन पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावरून जात होते. त्यावेळी उर्से टोल नाक्याजवळ पेट्रोल पंपाच्या समोर ते लघुशंकेसाठी थांबले असता हा प्रकार घडला.

Back to top button