पुणे : बावडा येथे अर्ध्या तासात 3 ठिकाणी कोसळली वीज! | पुढारी

पुणे : बावडा येथे अर्ध्या तासात 3 ठिकाणी कोसळली वीज!

बावडा : पुढारी वृत्तसेवा : बावडा (ता.इंदापूर) गावामध्ये बुधवारी (दि. 8) रात्री ढगांच्या कडकडाटासह मान्सूनपूर्व मुसळधार पाऊस झाला. अर्धा तास झालेल्या पावसात तीन ठिकाणी वीज कोसळली. परंतु, सुदैवाने यात जीवितहानी झाली नाही.

महाविकास आघाडीला धक्का! नवाब मलिक, अनिल देशमुखांना मतदानाची परवानगी नाकारली

रत्नप्रभादेवीनगर येथील आशिष नायकुडे यांच्या घराशेजारी वीज कोसळून 2 नारळाची झाडे जळून भस्मसात झाली. दुसर्‍या घटनेत शहाजीनगर येथे अजीत शेख यांच्या घराजवळील नारळाच्या झाडावर वीज कोसळून झाड जळाले. तिसऱ्या घटनेत इंदापूर-अकलूज रस्त्यावर असलेल्या राऊतवस्ती नजीक प्रदीप शिंदे यांच्या घराजवळ वीज कोसळून लिंबाच्या झाडाचे नुकसान झाले.

Ambani-Adani : अंबानी-अदानींना धक्का, 100 अब्ज डॉलर क्लबमधून बाहेर!

अर्ध्यातासात तीन ठिकाणी वीज कोसळल्याने नागरिकांनी आश्चर्य व्यक्त केले. या पावसाची बावडा येथील शंकरराव मोहिते पाटील कारखान्याच्या गट सेंटर येथे 31 मि.मी.एवढी नोंद झाल्याची माहिती कारखान्याचे संचालक महादेव घाडगे (बावडा) यांनी दिली. दरम्यान, ऊस व इतर पिकांना हा पाऊस अतिशय फायदेशीर असल्याची माहिती नीरा-भीमा सहकारी साखर कारखान्याचे संचालक दादासाहेब घोगरे (सुरवड) यांनी दिली.

Back to top button