पुणे : मेफेड्रॉन विक्री; तस्कराला बेड्या

पुणे : मेफेड्रॉन विक्री; तस्कराला बेड्या

पुणे : पुढारी वृत्तसेवा : मुंबईतून अमली पदार्थ आणून लष्कर परिसरात मेफेड्रॉन विक्रीच्या तयारीत असलेल्या तस्कराला अमली पदार्थविरोधी पथक-2ने लष्कर परिसरातून बेड्या ठोकल्या.

तस्काराकडून 2 लाख 12 हजारांचे 54 ग्रॅम मेफेड्रॉन (एमडी), मोबाईल, रोकड असा मिळून सव्वादोन लाखांचा ऐवज जप्त करण्यात आला. अझीम मोहम्मद युसुफ मोहम (वय 34, रा. नानीबाई चाळ, नावपाडा, कुर्ला पश्चिम) असे अटक केलेल्याचे नाव आहे. पथकाने वेलकम ट्रॅव्हल्स कॉर्पोरेशन दुकानासमोर सापळा रचून अझीम मोहम्मद याला ताब्यात घेतले.

त्याच्याकडून 2 लाख 12 हजारांचा 54 ग्रॅम एमडी, मोबाईल, रोकड असा सव्वादोन लाखांचा ऐवज जप्त केला. ही कामगिरी पोलिस उपायुक्त श्रीनिवास घाडगे, पोलिस निरीक्षक प्रकाश खांडेकर, उपनिरीक्षक, दिगंबर चव्हाण, प्रशांत बोमादांडी, साहिल शेख, दिनेश बास्टेवाड यांनी केली.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news