पुणे : किरकटवाडीत बेकायदा बांधकामे जमीनदोस्त | पुढारी

पुणे : किरकटवाडीत बेकायदा बांधकामे जमीनदोस्त

खडकवासला : पुढारी वृत्तसेवा

किरकटवाडी येथील बेकायदा बांधकामावर पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने धडक कारवाई करत पार्किंगमधील सदनिका व गाळे जमीनदोस्त केले.

महाविकास आघाडीला धक्का! नवाब मलिक, अनिल देशमुखांना मतदानाची परवानगी नाकारली

या घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. गेल्या वर्षी जून महिन्यात किरकटवाडीचा महापालिकेत समावेश करण्यात आला. गेल्या महिन्यात पालिकेने रस्त्यावरील अतिक्रमणावर कारवाई केली. त्यानंतर ‘पीएमआरडीए’कडून मंगळवारी धडक कारवाई करण्यात आली. अग्निशमन दल, महावितरण व पोलिस अशा फौजफाट्यासह ‘पीएमआरडीए’चे अनधिकृत विभागाचे तहसीलदार बजरंग चौगुले पथकाने कारवाई केली.

विधानपरिषद निवडणूक : सदाभाऊ खोत अपक्ष उमेदवार म्हणून रिंगणात, भाजपकडून पाठिंबा

किरकटवाडी येथील शिवनगर तसेच नानानगर भागातील काही नागरिकांनी अनधिकृत बांधकामाबाबत तक्रारी केल्या होत्या. परवानगी न घेता पार्किंगमध्ये सदनिका व गाळे बांधल्याचे पीएमआरडीएच्या पाहणीत स्पष्ट झाले. त्यानंतर कारवाई करण्यात आली.

मुंबई : मानखुर्दमध्ये पुन्हा अग्नीतांडव; गोदामांना भीषण आग

गुंठेवारीसाठी अर्ज करणे हाच उपाय

नव्याने समाविष्ट केलेल्या गावात अनेक बांधकामे अनधिकृत आहेत. शासनाने अनधिकृत बांधकामे नियमित करण्यासाठी गुंठेवारी योजना सुरू केली आहे. त्यात जास्तीत जास्त नागरिकांनी सहभागी होण्याची गरज आहे. पालिकेत समाविष्ट गावांतील बांधकामाचे अधिकार पीएमआरडीएकडे पालिकेला द्यावे, अशी मागणी माजी सरपंच सौरभ मते यांनी केली.

Back to top button