पुणे : माॅर्निंग वाॅकसाठी गेलेल्या महिलेचा कालव्यात बुडून मृत्यू | पुढारी

पुणे : माॅर्निंग वाॅकसाठी गेलेल्या महिलेचा कालव्यात बुडून मृत्यू

बारामती : पुढारी वृत्तसेवा

बारामतीत मुलीकडे आलेली महिला गुरुवारी (दि. ९) सकाळी कालव्याच्या भरावावरून माॅर्निंग वाॅक करत असताना कालव्यात घसरून पडल्याने तिचा बुडून मृत्यू झाला. सरस्वती गुणवंत तोंडारे (वय ६७, रा. भिगवण) असे या महिलेचे नाव आहे.

विधानपरिषद निवडणूक : सदाभाऊ खोत अपक्ष उमेदवार म्हणून रिंगणात, भाजपकडून पाठिंबा

गेल्या दोन दिवसांपूर्वी तोंडारे या बारामतीतील ओझर्डे इस्टेट येथे राहणाऱ्या आपल्या मुलीकडे आल्या होत्या. सकाळी सातच्या सुमारास त्या चालण्यासाठी कालव्याच्या भरावावर गेल्या होत्या, अशी माहिती नातेवाईकांनी पोलिसांना कळविली. या महिलेचे पती निवृत्त पोलिस कर्मचारी आहेत. सकाळी कालव्यात एका महिलेचा मृतदेह पोलिसांना दिसून आला. बीटमार्शल ठोंबरे, मनोज पवार आदींनी तात्काळ तो वर काढला. त्यानंतर ओळख पटविण्यात आली असल्याचे पोलिस निरीक्षक सुनील महाडीक यांनी सांगितले.

मुंबई : मानखुर्दमध्ये पुन्हा अग्नीतांडव; गोदामांना भीषण आग

कालव्याचे अस्तरीकरण बेततेय जीवावर

बारामतीत कालव्याला सिमेंटच्या स्लॅबचे अस्तरीकरण करण्यात आले आहे. त्यामुळे कालव्यात एखादी व्यक्ती पडल्यास तिला वर येता येत नाही. सिमेंटच्या अस्तरीकरणामुळे एखाद्या व्यक्तीने वर येण्याचा प्रयत्न केला तरी, ते अंग ओले असल्याने घसरून पुन्हा पाण्यात पडतात. पाण्याचा वेगवान प्रवाह असल्याने दम लागतो. त्यातून पाण्यात गंटागळ्या खात जीवाला मुकावे लागत आहे. पूर्वी कालव्याच्या दोन्ही बाजूने माती, गवत, झुडपे असल्याने त्याला धरून वरती येणे शक्य होत होते.

Back to top button