crime
crime

चुलत भावाचा खून करून आरोपी फरार; मळवंडी ठुले, मावळ येथील घटना

Published on

लोणावळा : मळवंडी ठुले (ता.मावळ, पुणे) येथे सख्ख्या चुलत भावाचा खून करून एक जण पसार झाला आहे. याप्रकरणी लोणावळा ग्रामीण पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, फरारी आरोपीचा शोध सुरू केला आहे. संतोष मारुती वाघमारे (35, रा. ठुले मळवंडी, ता. मावळ, जि. पुणे) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. तर रघुनाथ बबन वाघमारे (रा. येळसे, ता. मावळ) असे खून करून फरार असलेल्या आरोपीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अनिल मारुती वाघमारे, (30, रा. ठुले मळवंडी, ता. मावळ) याने या संदर्भात फिर्याद दिली आहे. फिर्यादीनुसार रविवार (दि. 5) सायंकाळी पाच वाजल्यापासून ते सोमवार (दि. 6) सकाळी दहाच्या दरम्यान मौजे तिकोणा (ता. मावळ जि.पुणे) गावचे हद्दीत मळवंडी ठुले येथील पाणलोट क्षेत्रात फिर्यादीचा चुलतभाऊ रघुनाथ वाघमारे याने अज्ञात कारणावरून, संतोष वाघमारे याच्या तोंडावर, नाकावर कोणत्यातरी हत्याराने मारून त्याला गंभीर जखमी केले. यात संतोष याच्या तोंडातून, नाकातून रक्त स्त्राव झाला; तसेच हनुवटीचे हाड मोडून त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. याप्रकरणी लोणावळा ग्रामीण पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

https://youtu.be/7KwsutS10qQ

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news