चिखली, फुलेनगर हॉटेल, मॉलला सील; महापालिकेच्या करविभागाची कारवाई

चिखली, फुलेनगर हॉटेल, मॉलला सील; महापालिकेच्या करविभागाची कारवाई

पिंपरी : महापालिकेच्या कर संकलन विभागाने थकबाकीदार मिळकतधारकांची मालमत्ता जप्तीची कारवाई जून महिन्यातच सुरू केली आहे. विभागाने मंगळवारी (दि.7) चिखली व महात्मा फुलेनगर येथील हॉटेल व शॉपिंग मॉलला सील लावले. त्या दोघांकडून एकूण दीड कोटींची थकबाकी अनेक वर्षांपासून शिल्लक आहे.

चिखली कर संकलन विभागीय कार्यालयाने आज केलेल्या कारवाईत रोहिदास मोरे यांची मिळकत सील केली. त्यांच्याकडे 1 कोटी 32 लाख 60 हजार 225 रुपयांचा मिळकतकर थकीत आहे. महात्मा फुलेनगर येथील संतोष फुले याची मिळकतही सील करण्यात आली. त्यांच्याकडे 14 लाख 40 हजार 860 थकबाकी आहे. सहायक आयुक्त नीलेश देशमुख, क्षेत्रीय अधिकारी सीताराम बहुरे, प्रशासन अधिकारी महेंद्र चौधरी, संजय लांडगे, महादेव चेरेकर, कालिदास शेळके, शंकर कानडी यांच्या पथकाने महाराष्ट्र सुरक्षा बलाच्या जवानांच्या मदतीने कारवाई केली.

थकबाकीदारांनी जप्ती टाळावी

आजअखेर शहरातील एकूण 1 हजार मोठ्या थकबाकीदारांना जप्तीपूर्व नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. थकबाकीदारांवर मिळकत सीलची कारवाई वर्षभर सुरू राहणार आहे. थकबाकीदारांनी संपूर्ण बिल भरून जप्तीची कारवाई टाळावी, असे आवाहन सहायक आयुक्त देशमुख यांनी केले आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news