चर्‍होलीसह वाकड, रावेतमध्ये कारवाई; महापालिकेच्या अतिक्रमणविरोधी पथकातर्फे 160 पत्राशेड जमीनदोस्त

चर्‍होलीसह वाकड, रावेतमध्ये कारवाई; महापालिकेच्या अतिक्रमणविरोधी पथकातर्फे 160 पत्राशेड जमीनदोस्त

पिंपरी: पुढारी वृत्तसेवा

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या बांधकाम परवानगी व अनधिकृत बांधकाम विरोधी विभागाच्या पथकाने कारवाई केली.चर्‍होली फाटा ते दाभाडे सरकार चौक येथील 45 मीटर रस्ता रूंदीकरणास अडथळा ठरणार्‍या 58 पत्राशेड व बांधकामे पाडण्यात आली. तर, वाकड, ताथवडे येथील 54 पत्राशेड तोडण्यात आले.

तसेच, रावेत येथील 48 अशा एकूण 160 पत्राशेड व बांधकामांवर कारवाई करण्यात आली. ही कारवाई मंगळवारी (दि.7) पोलिस बंदोबस्तात करण्यात आली. अतिरिक्त आयुक्त जितेंद्र वाघ, शहर अभियंता मकरंद निकम यांच्या मार्गदर्शनाखाली ई, ड आणि ब क्षेत्रीय अधिकार्‍यांच्या पथकाने ही कारवाई केली.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news