मोदी सरकारचे अनेक निर्णय चुकीचे : सुप्रिया सुळे | पुढारी

मोदी सरकारचे अनेक निर्णय चुकीचे : सुप्रिया सुळे

गडचिरोली, पुढारी वृत्‍तसेवा : मोदी सरकार हे अनेक निर्णय चुकीचे घेत आहे. परंतु प्रसारमाध्यमे त्याविरोधात आवाज उठविताना दिसत नाही. एकूणच माध्यमे हे केंद्र सरकारच्या दबावाखाली काम करताना दिसतात, असे वक्‍तव्य राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी गडचिरोली येथे केले.

माध्यमांशी बोलताना त्‍या म्‍हणाल्‍या, मध्य प्रदेश सरकारपेक्षा महाराष्ट्र सरकारच्या ओबीसीसंदर्भातील डेटा अधिक व्यापक होता. परंतु केवळ ४८ तासांत मध्य प्रदेश सरकारला मान्यता मिळते आणि महाराष्ट्र सरकारचा डेटा नाकारला जातो, हा एक चमत्कारच आहे असा टोला सुळे यांनी लगावला.

पुढे बाेलताना त्‍या म्‍हणाल्‍या, लोह आणि कोळसा खाणींमुळे प्रदूषणाची समस्या निर्माण झाली आहे. शिवाय पेसा क्षेत्रातील आदिवासींच्या अधिकारांचे हनन होत असल्याची टीका होत आहे. यावर कोणत्याही खाणींसंदर्भात पर्यावरणीय प्रभावाचे आकलन केल्याशिवाय खाण प्रकल्प उभारण्यात येऊ नयेत, असे आपले मत असून, तसा प्रस्ताव आपण संसदेत ठेवणार आहे.

अलीकडच्या काळात भाजप नेते बेताल वक्तव्य करीत असल्याबद्दल सुप्रिया सुळे यांनी नाराजी व्यक्त केली. पुरोगामी महाराष्ट्रात एकही महिला मुख्यमंत्री झाली नाही, याबाबत त्‍या म्हणाल्या की, कोणताही व्यक्ती हा त्याच्या कर्तृत्वामुळे मुख्यमंत्री होतो. असे त्‍या म्‍हणाल्‍या.

हेही वाचा  

Back to top button