नगर-औरंगाबाद मार्गावर कंटेनरने मुलाला चिरडले, आई गंभीर जखमी; रुग्णालयात दाखल | पुढारी

नगर-औरंगाबाद मार्गावर कंटेनरने मुलाला चिरडले, आई गंभीर जखमी; रुग्णालयात दाखल

जेऊर : पुढारी वृत्तसेवा

नगर – औरंगाबाद महामार्गावर शेंडी शिवारात कंटेनरच्या सावलीत बसलेला मुलाचा टायराखली आल्याने जागीच मृत्यू झाला आहे. या अपघातात आई जखमी झाली आहे. शेंडी शिवारातील वांबोरी फाटा नजीक गॅस पाईपलाईनचे पाईप घेऊन जाणार्‍या कंटेनरच्या (एम.एच.06 ए.क्यू. 6627) अपघातात बाबासाहेब काशीनाथ टेकाळे (वय 40, रा. बीड) याचा जागीच मृत्यू झाला, तर आई झुंबराबाई काशीनाथ टेकाळे (वय 65) या गंभीर जखमी झाल्या आहेत.

पिंपळगाव माळवी येथील मेहेरबाबांच्या रुग्णालयात हे मायलेक गेले होते. तेथून परत जाताना उभ्या असलेल्या कंटेनरच्या सावलीला मायलेक बसले असता, वाहनचालकाने वाहन सुरू करून पुढे घेतल्याने मुलगा कंटेनरच्या टायरखाली सापडून जागीच मृत्यू झाला, तर झुंबराबाई हिच्या पायावरून कंटेनर गेल्याने त्या गंभीर जखमी झाल्या आहेत.

काष्टी ग्रामपंचायत : सहा वॉर्डसाठी 17 जागेवर आरक्षण जाहीर; निवडणुकीला सहा महिन्यांचा अवकाश, नेत्यांची मोर्चेबांधणी

घटनास्थळी ‘एमआयडीसी’ पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक युवराज आठरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस कर्मचारी मोहम्मद शेख यांनी जखमीला रुग्णालयात पाठवून वाहतूक सुरळीत केली.

Back to top button