काष्टी ग्रामपंचायत : सहा वॉर्डसाठी 17 जागेवर आरक्षण जाहीर; निवडणुकीला सहा महिन्यांचा अवकाश, नेत्यांची मोर्चेबांधणी | पुढारी

काष्टी ग्रामपंचायत : सहा वॉर्डसाठी 17 जागेवर आरक्षण जाहीर; निवडणुकीला सहा महिन्यांचा अवकाश, नेत्यांची मोर्चेबांधणी

काष्टी : पुढारी वृत्तसेवा

श्रीगोंदा तालुक्यातील सर्वात मोठ्या लोकसंख्येचे गाव काष्टी ग्रामपंचायतीची निवडणूक सहा महिन्यांवर येवून ठेपली असून, शासनाच्या नियमाप्रमाणे निवडणुकीच्या अगोदर एकूण सहा वॉर्डसाठी 17 जागांवर आरक्षण जाहीर करण्यात आले आहे.

तालुक्यातील काष्टी ग्रामपंचायत वॉर्ड रचना आरक्षण पंचायत समितीचे अधिकारी कांगुणे व ग्रामसेवक साहेबराव घोरपडे यांनी भैरवनाथ मंदिरामध्ये ग्रामस्थांच्या समोर सोडत पध्दतीने जाहीर केले. यामध्ये आमदार मळा वॉर्ड क्रमांक एकसाठी सर्वसाधारण पुरुष एक, सर्वसाधारण स्त्री एक व अनुसूचित जाती पुरुष एक, असे एकूण तीन जागा, वॉर्ड क्रमांक दोनमध्ये सर्वसाधारण पुरुष एक, सर्वसाधारण स्त्री एक, अनुसूचित जाती-जमाती एक, असे तीन जागा, वॉर्ड क्रमांक तीनमध्ये सर्वसाधारण पुरुष एक, सर्वसाधारण स्त्री एक, अशा दोन जागा, वॉर्ड क्रमांक चारमध्ये, सर्वसाधारण पुरुष एक, सर्वसाधारण स्त्री दोन, अशा तीन जागा, वॉर्ड क्रमांक पाचमध्ये सर्वसाधारण पुरुष एक, सर्वसाधारण स्त्री एक व अनुसूचित जाती स्त्री एक एकूण तीन जागा आणि वार्ड क्रमांक सहामध्ये सर्वसाधारण पुरुष एक, सर्वसाधारण स्त्री दोन, असे तीन जागा अशा पध्दतीने सहा वार्डामध्ये 17 जागेसाठी सोडत पध्दतीने आरक्षण जाहीर झाले.

शिरूर न्यायालयाच्या आवारात जावयाकडून सासू आणि पत्नीवर गोळीबार

काष्टी ग्रामपंचायत गेल्या अनेक वर्षांपासून आमदार बबनराव पाचपुते यांच्या ताब्यात आहे. परंतु, चालू पाचवर्षांत निवडून आलेल्या ग्रामपंचायत सदस्यांची कामगिरी समाधानकारक नसल्याने ग्रामस्थ सदस्याच्या कारभारावर नाराज आहेत. यासाठी आमदार पाचपुते यांनी गावच्या कारभारात लक्ष देणे गरजेचे आहे. निवडणुकीला सहा महिने वेळ आहे. तत्पूर्वी याची श्रेष्ठीनी वेळीच दखल घेतली नाही, तर परिवर्तन अटळ आहे, असेही बोलले जात आहे.

सदस्यांमधून सरपंच निवड

17 सदस्यांमधून सरपंच निवड होणार आहे. पूर्वी भाजप सरकारने जनतेमधून सरपंच निवड कायदा केला होता. परंतु, आघाडी सरकार सत्तेवर आल्यानंतर यामध्ये बदल करून, तो पुन्हा निवडून आलेल्या ग्रामपंचायत सदस्यांमधून सरपंच निवड होणार आहे. यासाठी सरपंच निवडीला आरक्षण आहे.

Back to top button