दागिने चोरणार्‍या महिलांना अटक; दत्तवाडी पोलिसांची कामगिरी | पुढारी

दागिने चोरणार्‍या महिलांना अटक; दत्तवाडी पोलिसांची कामगिरी

पुणे : पुढारी वृत्तसेवा

सराफी पेढीत खरेदीच्या बहाण्याने दागिने चोरी करणार्‍या दोन महिलांना दत्तवाडी पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून 50 हजारांची सोनसाखळी जप्त करण्यात आली आहे. दोघींकडील तपासात चोरीचे दोन गुन्हे उघडकीस आले आहेत. ज्योत्स्ना सूरज कछवाय (वय 31, रा. अप्पर इंदिरानगर, बिबवेवाडी) आणि भाग्यश्री चंद्रकांत जेऊर (वय 29, रा. भारतनगर, कात्रज) अशी अटक करण्यात दोघींची नावे आहेत.

दत्तवाडी भागातील एका सराफी पेढीतून खरेदीच्या बहाण्याने कछवाय आणि जेऊरने 50 हजारांचे मंगळसूत्र लांबविले होते. पोलिसांकडून या गुन्ह्याचा तपास करण्यात येत होता. पुणे-सातारा रस्त्यावर दोघी थांबल्या होत्या. दोघींनी सराफी पेढीत चोरी केल्याची माहिती गस्त घालणारे पोलिस कर्मचारी प्रमोद भोसले, पुरुषोत्तम गुन्ला, दयानंद तेलंगे यांना मिळाली.

त्यानंतर सापळा लावून दोघींना ताब्यात घेण्यात आले. त्यांची चौकशी करण्यात आली. तेव्हा दोघींनी दत्तवाडी तसेच सांगवी परिसरातील सराफी पेढीतून खरेदीच्या बहाण्याने दागिने लांबविल्याचे उघड झाले.  कछवाय विरोधात सराफी पेढीत खरेदीच्या बहाण्याने चोरी केल्याप्रकरणी यापूर्वी 22 गुन्हे दाखल झाले आहेत. वरिष्ठ पोलिस निरीक्षक अभय महाजन, गुन्हे शाखेचे निरीक्षक विजय खोमणे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक स्वप्नील लोहार, कुंदन शिंदे यांच्या पथकाने केली.

हेही वाचा 

नाशिक पुन्हा हादरले ; कंपनी व्यवस्थापकाचा तलवारीने खून

शिरूर न्यायालयाच्या आवारात जावयाकडून सासू आणि पत्नीवर गोळीबार

लाखावर मोजण्या प्रलंबित; पुणे विभागात सर्वाधिक मोजण्या प्रतीक्षेत

Back to top button