बालभारतीकडून शाळांमध्ये पहिल्याच दिवशी पुस्तके | पुढारी

बालभारतीकडून शाळांमध्ये पहिल्याच दिवशी पुस्तके

पुणे : पुढारी वृत्तसेवा

यंदा राज्यभरातील शाळांमध्ये पहिल्याच दिवशी म्हणजे 13 जूनला पाठ्यपुस्तके मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ अर्थात ‘बालभारती’कडून समग्र शिक्षा अभियानाअंतर्गत देण्यात येणार्‍या पाठ्यपुस्तकांची छपाई तसेच वितरणाची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे.त्यामुळे हे शक्य होणार आहे.

शासनातर्फे स्थानिक स्वराज्य संस्था, अनुदानित, विनाअनुदानित व खासगी शाळांमध्ये इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके दिली जातात. यामध्ये मराठी, हिंदी आणि उर्दू माध्यमांच्या अनुदानित शाळांचा समावेश असतो. दरवर्षी ही पुस्तके जूनच्या पहिल्या आठवड्यातच शिक्षण विभागाकडे सोपविली जातात.

चंद्रपूर :२०२४ ची लोकसभा निवडणूक बारामतीतूनच लढविणार ; चंद्रपुरात खासदार सुप्रिया सुळे यांची माहिती

यंदा मात्र ‘बालभारती’कडून मे महिन्यातच पाठ्यपुस्तके पाठविण्यास सुरुवात करण्यात आली होती. पुस्तके वेळेत मिळाली नाहीत तर विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ शकते, ही बाब लक्षात घेऊन शाळेच्या पहिल्या दिवशीच विद्यार्थ्यांना नवी कोरी पाठ्यपुस्तके देऊन विद्यार्थ्यांचे स्वागत करण्याची तयारी जिल्हा परिषदेने केली आहे.

यासाठी प्राथमिक शिक्षण विभागाने समग्र शिक्षण अभियानांतर्गत ‘बालभारती’कडे पहिले ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी 23 लाख 82 हजार 775 पाठ्यपुस्तकांची मागणी केली होती. त्यानुसार पुणे जिल्हा परिषदेला 23 लाख 81 हजार 141 पाठ्यपुस्तकांचा पुरवठा करण्यात आला आहे.

सोलापूर : भीमा सहकारी साखर कारखाना निवडणूक, अंतिम मतदार यादी जाहीर

शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके देण्यासाठी जिल्हा परिषदेच्या वतीने योग्य नियोजन करण्यात आले आहे. त्यासाठी 55 टक्के शाळांना अगोदरच पुस्तके वितरित करण्यात आली आहेत. उर्वरित शाळांना 13 तारखेपूर्वी पुस्तकांचे वाटप करण्यात येणार असून, विद्यार्थ्यांना पहिल्याच दिवशी पुस्तके देण्याचा आमचा प्रयत्न आहे.

                                     – संध्या गायकवाड, शिक्षणाधिकारी, प्राथमिक शिक्षण विभाग

समग्र शिक्षा योजनेअंतर्गत शाळांना बालभारतीच्या वतीने देण्यात येणार्‍या पुस्तकांची छपाई तसेच वितरणाची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. विदर्भातील शाळा उशिरा सुरू होणार असल्या, तरी त्यांच्या पुस्तकांची वितरणाची प्रक्रियादेखील लवकरच पूर्ण केली जाणार आहे. त्यामुळे शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना पुस्तके मिळण्यात कोणतीही अडचण नाही.

                                                 – कृष्णकुमार पाटील, संचालक, बालभारती

हेही वाचा 

वीर मुरारबाजी पुरंदरची युद्धगाथा रुपेरी पडद्यावर

डिजिटल युद्धात ‘भीम’ गारद; भीम अ‍ॅपचा पराभव झाल्याचे चित्र

नाशिक : जेसीबीखाली सापडून चालकाचा जागीच मृत्यू

Back to top button