पांडुरंगा, वारी निर्विघ्न पार पडू दे; उपमुख्यमंत्री अजित पवारांचे साकडे | पुढारी

पांडुरंगा, वारी निर्विघ्न पार पडू दे; उपमुख्यमंत्री अजित पवारांचे साकडे

पुणे : पुढारी वृत्तसेवा

यंदा कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने पायी पालखी सोहळ्यासाठी प्रशासन तयारी करीत आहे. त्यातच कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याचे समोर येत आहे, त्यामुळे ‘यंदाची वारी निर्विघ्न पार पडो,’ असे साकडेच पांडुरंगाला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घातले. पंढरपूर आषाढी वारी पालखी सोहळ्याच्या नियोजनाची आढावा बैठक पवार यांच्या अध्यक्षतेखाली झाली.

त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. या वेळी सोलापूरचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे, साताराचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील उपस्थित होते. वारकर्‍यांना कोरोना प्रतिबंधक लसीकरणासाठी आवाहन केले जाणार असून, त्यांना लशीचे तिन्ही पैकी कोणताही डोस वारीमध्ये उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचेही पवार यांनी सांगितले.

नाशिक : खळवाडी परिसरामध्ये विहिरीत आढळला मृतदेह

पवार म्हणाले, ‘आळंदी, देहू आणि सासवड येथील पालखी सोहळ्यांसह इतर पालखी सोहळ्यांचा आढावा बैठकीत घेण्यात आला. यापूर्वी त्या-त्या जिल्ह्यांच्या जिल्हाधिकार्‍यांनी नियोजनाच्या बैठका घेतल्या आहेत, परंतु त्यामध्ये काही त्रुटी राहिल्या आहेत का, हे पाहण्यासाठी आणि सोहळा प्रमुखांचे म्हणणे ऐकूण घेण्यासाठी ही बैठक घेण्यात आली. पंढरपूरला तयारी करण्यात येत आहे, पालखी सोहळा निघण्यापूर्वी 12 जून राेजी विभागीय आयुक्त सौरभ राव पंढरपूरला जाऊन प्रत्यक्ष पाहणी करणार असल्याचे पवार यांनी सांगितले.
तयारी अंतिम टप्प्यात

पुणे, सातारा आणि सोलापूर जिल्ह्यातून जाणार्‍या दोन्ही पालखी सोहळ्यांसाठी तिन्ही जिल्ह्यांची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. पुण्याचे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख म्हणाले, जेजुरी पालखी तळाची कामे सुरू करण्यात आली आहेत. पालखी मार्गावर महिलांसाठी 5 कि.मी. अंतरावर शौचालय सुविधा करण्यात येणार आहे. अतिरिक्त मोबाईल टॉवर उभारण्याचे नियोजन आहे.

हेही वाचा

नाशिकच्या बजरंगवाडी परिसरात 70 वर्षीय वृद्धाची आत्महत्या

नाशिक : निर्‍हाळे येथे विहिरीत पाय घसरून पडल्याने युवतीचा मृत्यू

काचेच्या प्रतिमेत शिवराज्याभिषेक सोहळा; ‘भारत वर्ल्ड रेकॉर्ड’कडून दखल

Back to top button