शिल्लक उस 12 जूनपर्यंत संपवणार: सहकारमंत्र्यांची ग्वाही | पुढारी

शिल्लक उस 12 जूनपर्यंत संपवणार: सहकारमंत्र्यांची ग्वाही

पुणे : पुढारी वृत्तसेवा

’राज्यात चालू वर्षीच्या हंगामात शेवटच्या टप्प्यातील जेमतेम दोन लाख मेट्रिक टन उसाचे गाळप बाकी असून, 12 जून रोजी हंगाम संपुष्टात येईल. सद्य:स्थितीत 1 हजार 318 लाख मेट्रिक टन इतके उच्चांकी ऊसगाळप पूर्ण झाले असून, गतवर्षापेक्षा ते 305 लाख मेट्रिक टनांनी अधिक झाले आहे,’ अशी माहिती सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांनी दिली.

पुढील वर्षीचा ऊसगाळप हंगामही आव्हानात्मक असेल, असेही त्यांनी स्पष्ट केले. वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या (व्हीएसआय) मांजरी येथील मुख्यालयात राज्यस्तरीय साखर परिषदेत विविध पुरस्कारांचे वितरण झाल्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. या वेळी विशाल पाटील, साखर आयुक्त शेखर गायकवाड आदी उपस्थित होते. ’साखर परिषदेत विविध विषयांवर ऊहापोह झाला आहे.

उसाची बियाणे निवड, लागवड ते संपूर्ण ऊसगाळप हंगामातील उत्पादन, उपपदार्थनिर्मिती, पर्यावरण, खर्चात काटकसर, आर्थिक व्यवस्थापन आणि निर्यातीसह विविध बाबींचा समावेश आहे. त्यास सलग दोन दिवस चांगला प्रतिसाद
मिळाला असून, परिषद यशस्वी झाली आहे,’ असे ते म्हणाले.

पत्नीच्या गुप्तांगावर काचेच्या बाटलीने वार करून खून करणाऱ्यास जन्मठेप

राज्यात दोन वर्षांच्या निराशेच्या गर्तेतील साखर उद्योग आता बाहेर पडला असून, सध्या चांगला टर्निंग पॉइंट मिळून आता ऊर्जितावस्था आल्याचे त्यांनी स्पष्ट केले. ऊसतोडणी कामगारांच्या समस्येवर यांत्रिकीकरणाच्या उपाययोजनांवर परिषदेत चर्चा झाल्याबद्दल छेडले असता ते म्हणाले, ’व्हीएसआयकडून हार्वेस्टरसाठी संशोधन सुरू असून, काही मशिनरीद्वारे ऊसतोडणीच्या चाचण्या सुरू आहेत. केंद्र सरकारमध्ये ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या कार्यकाळात ऊसतोडणी यंत्रासाठी 25 लाख अनुदानाची योजना कार्यरत होती.

मात्र, त्यानंतर योजना बंद झाली असून, केंद्राने हार्वेस्टर अनुदान योजना राबविण्यास पुढाकार घ्यावा, अशी आमची मागणी आहे.’
‘राज्यात बंद असलेले 12 कारखाने आम्ही सुरू केल्यामुळे त्यांच्यामार्फत सुमारे 26 लाख टन उसाचे गाळप पूर्ण केले आहे. इथेनॉलकडे ऊस वळविल्याने 20 लाख मेट्रिक टन उसाचे गाळप झाले.

उसाच्या नोंदी शेतकरी करीत नाहीत. त्यामुळे ऊस कुणालाही द्या; पंरतु नोंदी करा,’ असे आवाहन त्यांनी केले. पुढच्या वर्षीही राज्यात मोठ्या ऊसगाळपाचे आव्हान आहे. बंद असलेले आणखी तीन ते चार कारखाने आम्ही सुरू करणार असून, राज्य बँकेच्या ताब्यातीलही दहा कारखाने सुरू करण्यासाठी प्रयत्न आहे, असे पाटील यांनी स्पष्ट केले.

हेही वाचा 

‘या’ खेळाडूने सचिन तेंडूलकरचे डोके फाेडण्याचा आखला होता प्लॅन

ब्रॅड हॉग म्हणाले, अजिंक्य, ईशांतला वगळण्याचा निर्णय योग्य

‘या’ खेळाडूने सचिन तेंडूलकरचे डोके फाेडण्याचा आखला होता प्लॅन

Back to top button