मोक्काच्या गुन्ह्यात फरार असलेला सराईत गुन्हेगार “बंदर” अडकला पोलिसांच्या जाळ्यात | पुढारी

मोक्काच्या गुन्ह्यात फरार असलेला सराईत गुन्हेगार “बंदर” अडकला पोलिसांच्या जाळ्यात

पिंपरी : मोक्काच्या गुन्ह्यात फरार असलेला सराईत गुन्हेगार “बंदर” पोलिसांच्या जाळ्यात अडकला आहे. गुन्हे शाखा युनिट चारच्या पथकाने पिंपळे गुरव येथे ही कारवाई केली. दीपक उर्फ बंदर राजू सावंत (26, रा. राजीव गांधी नगर झोपडपट्टी, पिंपळे गुरव, सांगवी) असे अटक करण्यात आलेल्या सराईत गुन्हेगाराचे नाव आहे. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी आयुक्तालयाच्या रेकॉर्डवरील गुन्हेगारांच्या हालचालीवर लक्ष ठेवण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार, गुन्हे शाखा युनिट चारचे पोलीस सांगवी हद्दीत गुन्हेगार तपासत होते.

पिंपरी चिंचवडची सत्ता राष्ट्रवादीला द्या; शहराला दररोज पाणी देतो, अजित पवार यांनी फुंकले रणशिंग

दरम्यान, पथकातील सहाय्यक फौजदार मिसाळ, पोलीस शिपाई चव्हाण आणि शिंदे यांना माहिती मिळाली की, तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात दरोडा आणि मोक्काच्या गुन्ह्यात फरार असलेला सराईत गुन्हेगार दीपक उर्फ बंदर सावंत हा त्याच्या आई-भेटण्यासाठी पिंपळे गुरव येथे येणार आहे. त्यानुसार, पोलिसांनी त्याच्या घराजवळ सापळा लावून त्याला ताब्यात घेतले. दीपक उर्फ बंदर याला मे 2019 मध्ये तत्कालीन खंडणी, दरोडा विरोधी पथकाने देखील अटक केली होती.

नाट्यगृहांच्या उत्पन्नाची गाडी रुळावर, शनिवार, रविवार बुकिंग फुल; इतर दिवशीही कार्यक्रमांची रेलचेल

सृष्टी चौकात सापळा लावून त्याला ताब्यात घेण्यात आले होते. त्याच्या विरोधात मोक्का, दरोडा, दरोड्याची तयारी, खुनाचा प्रयत्न असे गुन्हे दाखल आहेत. तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात सन 2018 मध्ये दाखल असलेल्या दरोड्याच्या गुन्ह्यात मोक्काची कारवाई करण्यात आल्याने तो फरार झाला होता. ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक मछिंद्र पंडित, सहाय्यक निरीक्षक अंबरीश देशमुख, सहाय्यक निरीक्षक सिद्धनाथ बाबर, उपनिरीक्षक गणेश रायकर, सहाय्यक फौजदार धर्मराज आवटे, दादा पवार, नारायण जाधव यांच्या पथकाने केली.

Back to top button