पंतप्रधानांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर पोलिस आयुक्तांनी केली देहूतील मंदिर परिसराची पाहणी | पुढारी

पंतप्रधानांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर पोलिस आयुक्तांनी केली देहूतील मंदिर परिसराची पाहणी

देहूरोड : जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज शिळा मंदिराच्या लोकार्पण सोहळ्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी 14 जून रोजी देहूत येणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर मंदिर आणि सभा मंडप परिसराची पोलिस आयुक्त अंकुश शिंदे यांनी पाहणी केली.

लोकार्पण सोहळ्यानंतर पंतप्रधान मोदी यांची सभा होणार आहे. त्यामुळे सोहळ्याचे नियोजन व सुरक्षितताच्या पार्श्वभूमीवर देहूतील मुख्य मंदिराच्या कार्यालयात शुक्रवारी नियोजन आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.

राज्यात कुठेही मास्कची सक्ती नाही; मात्र, गर्दीच्या ठिकाणी वापराचे आवाहन: राजेश टोपे

पोलिस आयुक्त अंकुश शिंदे, अपर पोलिस आयुक्त संजय शिंदे, श्री संत तुकाराम महाराज संस्थानचे अध्यक्ष नितीनमहाराज मोरे, माजी राज्यमंत्री बाळा भेगडे, हवेलीचे तहसीलदार गीता गायकवाड, नायब तहसीलदार प्रवीण ढमाले, देहू नगरपंचायतीचे मुख्याधिकारी डॉ. प्रशांत जाधव, सहायक पोलिस आयुक्त नंदकुमार भोसले आदी उपस्थित होते. पोलिस आयुक्तांनी मंदिरातील भजनी मंडप मंदिराच्या पश्चिमेकडील इंद्रायणी नदी समोरील पान दरवाजा तसेच परिसराची पाहणी केली. तसेच, सुरक्षिततेच्या दृष्टीने सूचनाही केल्या.

Back to top button