राज्यात कुठेही मास्कची सक्ती नाही; मात्र, गर्दीच्या ठिकाणी वापराचे आवाहन: राजेश टोपे | पुढारी

राज्यात कुठेही मास्कची सक्ती नाही; मात्र, गर्दीच्या ठिकाणी वापराचे आवाहन: राजेश टोपे

पुणे: पुढारी वृत्तसेवा

राज्यात मास्क वापरण्याची सक्ती कुठेही केली जाणार नाही. मात्र गर्दीच्या ठिकाणी मास्क वापरावा असे आवाहन सरकारच्या आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात आले आहे, अशी माहिती राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी पुणे येथे बोलताना दिली.

पुणे शहरातील वसंतदादा वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमध्ये शनिवारी साखर परिषदेचे उद्घाटन झाले यावेळी पत्रकारांशी बोलताना राजेश टोपे यांनी ही माहिती दिली. यावेळी ते म्हणाले की, राज्यात मुंबई, पुणे ,रायगड ,पालघर या भागात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. एका सर्चमध्ये ही बाब समोर आल्यामुळे केंद्र शासनाकडून तशा सूचना आल्यामुळे राज्य शासनाच्या आरोग्य विभागाने मास्क वापरण्याचे आवाहन केले आहे. गर्दीच्या ठिकाणी आता लोकांनी मास्कचा वापर करून सरकारला सहकार्य करण्याची अपेक्षा व्यक्त केली.

मुलांसाठी पतीने पत्नीला दिली किडनी

बोगस डॉक्टरांची शोध मोहीम घेणार

राज्यात बोगस डॉक्टरांची संख्या वाढल्याचे निदर्शनास आले आहे. स्टेरॉइडचे इंजेक्शन विनाकारण देणाऱ्या डॉक्टरांचा शासनाच्यावतीने शोध घेण्यात येत असून याबाबत गृह विभागाला पत्र देणार आहे असेही टोपे यांनी सांगितले.

नागरिकांच्या जिवाशी खेळू नका; हडपसर उड्डाणपुलावरील बॅरिकेड्स काढण्याची नागरिकांची मागणी

कनिष्ठ डॉक्टरांना पदोन्नती देणार

राज्यातील 90 उच्चपदस्थ वैद्यकीय सेवेतून सेवानिवृत्त झाल्याने आरोग्य विभागात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. या प्रश्नावर टोपे म्हणाले, की सरकार समोर खरोखर मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. मात्र त्यावर आम्ही तोडगा काढला असून ज्युनियर डॉक्टरांना त्या जागेवर काम करण्याची संधी देण्यात येईल आणि ती पदे अपग्रेड करण्यात येतील.

Back to top button