Nashik Pune Railway : योग्य मोबदला द्या, अन्यथा प्रकल्प रद्द करा, शेतकरी आक्रमक | पुढारी

Nashik Pune Railway : योग्य मोबदला द्या, अन्यथा प्रकल्प रद्द करा, शेतकरी आक्रमक

नाशिक (दातली) : पुढारी वृत्तसेवा

नाशिक- पुणे रेल्वे (Nashik Pune Railway) प्रकल्पासाठी तालुक्यात जमिनी अधीग्रहित करण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्यात काही गावे अग्रेसर असून काही गावांमध्ये जमिनीच्या मूल्यांकनावरून विरोध होत आहे. या पार्श्वभूमीवर मुसळगाव येथे प्रकल्पबाधित शेतकऱ्यांची 1 जून रोजी बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत सर्वच शेतकऱ्यांनी प्रकल्पास तीव्र विरोध केला.

मुसळगाव येथे रेल्वे प्रकल्पाला विरोध करत दिलेले ठराव मंजूर करा अन्यथा मुसळगाव येथून जाणारा हा रेल्वे प्रकल्प रद्द करा अशी मागणी स्थानिक शेतकऱ्यांनी व गावकऱ्यांनी केली आहे. मुसळगाव शिवारातील काही शेतकऱ्यांची शेतजमीन कायमस्वरूपी जात असून यात बरेचसे शेतकरी हे भूमिहीन होणार आहे. तसेच या प्रकल्पकरिता, शासनाने जाहीर केलेले जमिनीचे दर हे अत्यल्प असल्याने मुसळगाव येथील शेतजमिनीतून जाणारा प्रकल्प हा कायमस्वरूपी रद्द करण्यात यावा यासाठी शेतकरी आक्रमक झाले आहेत. योग्य मोबदला मिळाल्याशिवाय शेतजमीन न देण्याचा ठराव करण्यात यावा असा अर्ज बैठकीत वाचन करून त्यावर सविस्तर चर्चा करण्यात आली. प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना योग्य मोबदला मिळावा, पात्रते प्रमाणे नोकरी मिळावी, इत्यादी बाबी लक्षात घेऊन जमिन संपादित करावी अशी आग्रही मागणी बैठकीत शेतकऱ्यांनी लावून धरली.

हेही वाचा :

Back to top button