गावरान आंब्यांचा सीझन झाला सुरू; वेगवेगळी नावे प्रचलित: झिरो बजेट असणारी झाडे | पुढारी

गावरान आंब्यांचा सीझन झाला सुरू; वेगवेगळी नावे प्रचलित: झिरो बजेट असणारी झाडे

दिवे : पुढारी वृत्तसेवा

ग्रामीण भागात सध्या गावरान आंब्यांचा सीझन सुरू झाला आहे. पूर्वी गावरान आंब्यांच्या झाडांची संख्या जास्त होती; मात्र मधल्या काळात पडलेला दुष्काळामुळे गावरान आंब्यांची संख्या कमी झाली आहे. अगदी 50 ते 100 वर्षांपूर्वीची ही बांधावरील झाडे शेतकर्‍यांना उन्हाळ्यात चार पैसे हमखास उत्पन्न मिळवून देणारी होती; मात्र आता ती फार कमी झाली आहेत.

आकाराने मोठा म्हणून लोद्या तुरट लागतो, तर शेप्या रंगाने लालबुंद असतो. शेंर्द्या रंगाने थोडा वेगळा, तर रताळ्या आकाराने लहान असल्याने गोटी. हा गोटी आकाराचा आंबा चवीला अप्रतिम असतो. दहा आंबे खाल्ले तरी कमीच, चवीने अतिशय गोड म्हणून साखर्‍या आंबा परिपक्व झाल्यानंतर त्याला गळती लागते. अशी ही आंब्यांची वेगवेगळी नावे ठेवण्यात अलेली आहेत.

नागपूर : ज्येष्ठ कामगार नेते आणि महाराष्ट्राचे माजी राज्यमंत्री हरिभाऊ नाईक यांचं वृद्धापकाळाने निधन

आंब्यांची झाडे लावणारी माणसे आता हयात नाहीत, परंतु त्यांनी दिलेली नावे मात्र अजूनही जशीच्या तशी आहेत. हे गावरान आंबे काहीसे उशिरा येतात; मात्र या झाडांना कुठलेही खत नाही, कुठलीही औषध फवारणी नाही, पाणी नाही असे असते. एकंदरीत झिरो बजेटचा ही झाडे शेतकर्‍यांना हमखास उत्पन्न मिळवून देणारी आहेत आणि आपल्या पूर्वजांची आठवण करून देणारी आहेत.

आमच्या बांधावर आमचे वडील कै. निवृत्ती धुळा फडतरे यांनी हा साखर्‍या आंबा जवळपास 70 वर्षांपूर्वी लावला होता. याला आत्तापर्यंत चार टन माल मिळाला आहे. अजून एक टन माल मिळेल, परंतु जास्त उंच असल्यामुळे तो काढणे अशक्य आहे. दयानंद फडतरे, शेतकरी, बोपगाव.

हेही वाचा 

अंबाजोगाई : स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालय परिसरात सापडले मृत अर्भक

आयटीनगरीत फोफावतेय खासगी सावकारी; आत्महत्या किंवा घरदार सोडून जाणे हाच पर्याय

जिल्ह्यातील धरणांच्या पातळीत मोठी घट पाणीसाठा 35 टक्क्यांच्या खाली

 

Back to top button