अंबाजोगाई : स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालय परिसरात सापडले मृत अर्भक | पुढारी

अंबाजोगाई : स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालय परिसरात सापडले मृत अर्भक

अंबाजोगाई ; पुढारी वृत्तसेवा : स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण रुग्णालय परिसरातील मुलांच्या वस्तीगृह इमारतीच्या सुरक्षा भिंतीजवळ स्त्री जातीचे अर्भक मृतावस्थेत आढळले. याप्रकरणी अंबाजोगाई शहर पोलिसांनी पंचनामा करून अज्ञात आरोपींवर गुन्हा दाखल केला आहे.

स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण रुग्णालयात बी बिल्डिंगमध्ये प्रसूती कक्ष आहे. याआधी रुग्णालय परिसरात अनेकवेळा अर्भक आढळल्याच्या घटना घडल्या आहेत. पण मृतावस्थेत अर्भक पहिल्यांदाच आज या परिसरात आढळून आले.पोलिसांनी पंचनामा करून मृत अर्भक रुग्णालयाच्या ताब्यात दिले. अर्भक स्त्री जातीचे सापडल्याने शहरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणाचा तपास पोलिसांनी त्वरीत करावा तसेच रूग्णालय प्रशासन याबाबत गांभीर्याने घेणार का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

हेही वाचलंत का?

Back to top button