अल्पवयीन मुलीवर अत्याचार; गरोदर राहिल्यानंतर प्रकार उघडकीस

अल्पवयीन मुलीवर अत्याचार; गरोदर राहिल्यानंतर प्रकार उघडकीस

पिंपरी : अल्पवयीन मुलीला गुंगीचे औषध पाजून तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. मुलगी गरोदर राहिल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. ही घटना डिसेंबर 2021 आणि जानेवारी 2022 या कालावधीत घरकुल चिखली आणि पूर्णानगर चिखली येथे घडली.

सुरज अनिल काळे (रा. घरकुल चिखली) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पीडित मुलीने गुरुवार २जून रोजी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने मुलीच्या घरी जाऊन तिच्यावर जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले. तसेच, मुलगी आकुर्डी येथून कॉलेजवरून घरी येत असताना तिला पाण्यातून गुंगीकारक औषध दिले. त्यानंतर मुलीला रिक्षातून पूर्णानगर येथील एका कॅफेमध्ये नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. दरम्यान, मुलगी गरोदर राहिल्याने हा प्रकार उघडकीस आला. चिखली पोलीस तपास करीत आहेत.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news