जगभरातील संगीत विद्यापीठांत पोहोचणार केतकीचा आवाज | पुढारी

जगभरातील संगीत विद्यापीठांत पोहोचणार केतकीचा आवाज

पुणे : पुढारी वृत्तसेवा

भारताच्या स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त केंद्र सरकारकडून ‘रागोपनिषद’ या संगीत अल्बमची निर्मिती करण्यात आली आहे. यात पुण्यातील गायिका केतकी माटेगावकर हिचा अल्बममध्ये सहभाग असणार आहे. या अल्बममध्ये देशभरातील ज्येष्ठ आणि आघाडीच्या गायकांसोबत केतकीने गायन केले असून, ती या समूहामधील सर्वांत तरुण गायिका आहे.

भारत सरकारकडून या अल्बमची निर्मिती होत असून, यामध्ये पूर्णपणे शास्त्रीय संगीताचा समावेश आहे. अनेक पुरातन बंदिशी यामध्ये गायकांनी सादर केल्या असून, हा वारसा जगभरातील संगीत विद्यापीठांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न यातून करण्यात येणार आहे.
शास्त्रीय संगीत गायनाचा केतकीचा हा पहिलाच अल्बम असून, तिने यामध्ये राग समेरी सादर केला आहे.

महिला पोलिस कर्मचार्‍यांना धक्काबुक्की; दोन महिलांना अटक

राग समेरीतील बंदिश तिने गायली आहे. हरिहरन, राशिद खान, पं. व्यंकटेश कुमार, देवकी पंडित, सोनू निगम, जावेद अली, आरती अंकलीकर-टिकेकर, साधना सरगम, जसविंदर नरुला अशा ज्येष्ठ आणि आघाडीच्या गायकांनी या अल्बममध्ये गायन केले आहे.

संगीतकार डॉ. भरत बलवल्ली यांच्या संकल्पनेतून हा संगीत अल्बम तयार झाला असून, यामध्ये भारतातील पुरातन बंदिशी सादर केल्या जाणार आहेत. हा एक आगळावेगळा प्रकल्प आहे. हा अल्बम भारत सरकारद्वारे जगातील सर्व अग्रगण्य संगीत विद्यापीठांना भारतीय संगीताच्या प्रसारासाठी स्मरणिका म्हणून भेट दिला जाणार आहे.

शास्त्रीय संगीतातील हा माझा पहिलाच अल्बम असून, हा अनुभव खूप छान होता. जागतिक व्यासपीठावर भारतीय शास्त्रीय संगीताचे प्रतिनिधित्व केल्याचे खूप समाधान मिळते आहे. भारतीय सांगीतिक वारसा यानिमित्ताने जपला जाणार आहे.

                                         – केतकी माटेगावकर, गायिका

हेही वाचा 

यशोगाथा : सोलर ड्रायरमुळे पालटले दिवस! ९ लाख रुपयांचे वार्षिक उत्पन्न

गॅसच्या टाकीचा स्फोट आणि , होत्याचं नव्हतं झालं !

नाशिक : खांद्यावर हात ठेवल्याने पत्नीची पतीच्या कानशिलात, पतीकडून चाकूने वार

Back to top button