एक्सप्रेस वे वर भीषण अपघात...कंटेनरने दुचाकीस्वाराला उडवले | पुढारी

एक्सप्रेस वे वर भीषण अपघात...कंटेनरने दुचाकीस्वाराला उडवले

पुणे : पुढारी वृत्तसेवा

यशवंतराव चव्हाण द्रुतगती मार्ग म्हणजेच एक्सप्रेस वे वर शुक्रवारी दुपारी बाराच्या सुमारास भीषण अपघात घडला. एका कंटेनर चालकाने एका दुचाकीस्वाराला उडवले. या अपघातात महिलेचा जागीच मृत्यू झाला असून, दुचाकीचालक महिलेचा पती गंभीर जखमी आहे.

Video: बेधडक दादा ! “थोडं बारीक व्हा”, पोलीस आयुक्तांसमोरच अजित पवारांनी उपायुक्तांना दिला सल्ला

नव्या एक्सप्रेस वे मार्गावर दुचाकीस्वारांना येण्यास बंदी असतानाही दुचाकीस्वारांची घुसखोरी मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. या संदर्भात दैनिक पुढारी मध्ये गेल्या आठवड्यात मालिका प्रसिद्ध केले होती. मात्र तरी देखील याकडे महामार्ग पोलिस प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचे दिसत आहे. बंदी असतानाही दुचाकी एक्सप्रेस वे वर येतातच कशा, असा सवाल आता उपस्थित होत आहे.

Nashik : तब्बल 39 वर्षानंतर नाशिकमध्ये कांदा परिषद, सदाभाऊ खोत करणार नेतृत्व

काही दिवसांपूर्वीच दै. ‘पुढारी’ने या प्रश्नावर सविस्तर मालिका प्रकाशित करून या प्रश्नाकडे लक्ष वेधले होते. तरीहीसंबंधित अधिकाऱ्यांचे या बाबींकडे दुर्लक्ष होते आहे ही खेदाचीबाब आहे.

राहुल गांधींना ईडीची पुन्हा एकदा नोटीस

दरम्यान, महामार्ग पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या अपघातात महिलेचा जागीच मृत्यू झाला असून, दुचाकीचालक महिलेचा पती गंभीर जखमी आहे. त्यांचा दोन वर्षाचा मुलगा मात्र थोडक्यात बचावला आहे. अपघातग्रस्त दुचाकीचालक आजूबाजूच्या परिसरातीलच असल्याची प्राथमिक माहिती असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Back to top button