पुणे : आंबवणेतील अपघातात दोघांचा मृत्यू | पुढारी

पुणे : आंबवणेतील अपघातात दोघांचा मृत्यू

वेल्हे : पुढारी वुत्त सेवा

वेल्हे-नसरापूर रस्त्यावर आंबवणे (ता. वेल्हे ) जवळ कारने दुचाकीला धडक दिल्याने झालेल्या अपघातात दुचाकी चालकासह दोंघाचा मृत्यू झाला. तर एक जण गंभीर जखमी झाला. गोकुळ गुलाब बांदल (वय २९), नारायण मारुती इंगवले (वय ५६) अशी मृतांची नावे आहेत. काळु अन्याबा बांदल (वय ५५) असे जखमीचे नाव आहे. हे तिघेही निगडे बुद्रुक (ता. वेल्हे) गावचे रहिवासी आहेत. दोघांच्या आकस्मिक मृत्युने गावावर शोककळा पसरली आहे.

साकीनाका बलात्कार प्रकरणी आरोपीला फाशीची शिक्षा

या प्रकरणी वेल्हे पोलिसांनी कार चालका विरोधात गुन्हा दाखल केला आहे. अपघातानंतर चालक फरार झाला आहे. त्याचा शोध सुरू असल्याचे वेल्हे पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक मनोज पवार यांनी सांगितले. या प्रकरणी नवनाथ बांदल यांनी वेल्हे पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.

महाड : पतीच्या त्रासाला कंटाळून तिने घेतला ६ मुलांचा जीव; पतीविरूद्ध गुन्हा दाखल

मंगळवारी ( दि.३१) रोजी सांयकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास आंबवणे येथील एका फार्महाऊस जवळ हा अपघात झाला. गोकुळ बांदल हा गावातील ज्येष्ठ नागरिक नारायण इंगवले व अन्याबा बांदल यांना दुचाकीवरुन घेऊन नसरापूर येथून गावाकडे चालला होता. त्यावेळी वेल्हे कडून नसरापूर कडे जाणाऱ्या कार (एमएच ११ सीजी ७३०५) ने दुचाकीला धडक दिली. त्यात काळु बांदल, गोकुळ बांदल व नारायण इंगवले तिघेही गंभीर जखमी झाले. तिघांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. नारायण इंगवले यांचा मंगळवारी व गोकुळ बांदल यांचा बुधवारी (दि.१) मृत्यू झाला. काळु बांदल यांच्यावर नसरापूर येथील खासजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

Back to top button