पिंपरी-चिंचवडमध्ये ‘क्लाउड किचन’ला मोठी ‘डिमांड’

पिंपरी-चिंचवडमध्ये ‘क्लाउड किचन’ला मोठी ‘डिमांड’

शशांक तांबे

पिंपरी : पिंपरी-चिंचवड या औद्योगिक नगरीत तसेच हिंजवडीसारख्या ठिकाणी नोकरीनिमित्ताने बाहेरगावहून येणार्‍यांची संख्या वाढतेच आहे. तसेच शिक्षणानिमित्तही शहरात परगावचे अनेक विद्यार्थी राहत आहेत. त्यांच्या रोजच्या जेवणाचा प्रश्न सोडवण्यासाठी क्लाउड किचन मोठ्या प्रमाणात सुरू झाले असून, त्यांच्याकडून उत्तम सेवा मिळत असल्याने शहरात क्लाउड किचनची डिमांड वाढली आहे.

शहरातील विद्यार्थी, आयटीयन्स, कंपन्यांमधील प्रशासकीय अधिकारी यांचे शहरातील वास्तव्य मोठ्या प्रमाणात वाढले असून रात्री उशिरापर्यंत क्लाउड किचनच्या माध्यमातून सुविधा मिळत आहेत. त्यामुळे शहरात क्लाउड किचनची संख्या वाढली आहे. पुणे , मुंबई सारख्या शहरात कमर्चारी वर्गापासून ते उच्च्भ्रू व्यक्तींच्यारोजच्या जेवणाचा प्रश्न सोडवणार्‍या क्लाउड किचनला शहरात मागणी आहे.

क्लाउड किचन म्हणजे काय ?

खाणावळीप्रमाणेच जेवणाची सुविधा देणारा हा व्यवसाय आहे. यामध्ये सकाळच्या नाष्ट्यापासून ते रात्रीच्या जेवणापर्यंतची सुविधा दिली जाते. त्यामुळे दिवसभराच्या खाण्याचा प्रश्न मिटतो. खाद्यपदार्थ घरगुती पद्धतीने बनवले जात असल्याने घरच्या जेवणाचा आस्वाद घरापासून दूर राहूनही घेता येतो.

एकाच ठिकाणी नाष्ट्यासह जेवणाची सुविधा मिळत असल्याने ग्राहक प्रतिसाद देतात. शिवाय घरगुती स्वरूपाच्या खाद्यपदार्थांमुळे तब्येतीची चिंता नसते. योग्य बजेटमध्ये पोटा-पाण्याचा प्रश्न मिटतो. याठिकाणी फक्त डबे घेऊन जाण्याची सुविधा असते. त्यामुळे सकाळच्या नाष्ट्यानंतर ऑफिसला किंवा कॉलेजला जाताना दुपारचा डबा घेऊन जात येतो तसेच ऑफिसवरून येताना रात्रीचा डबा घरी घेऊन घेता येतो.

डब्याची किंमत

दोन वेळचा डबा 1500 महिना
नाष्ट्यासह 1700 महिना

शहरात जवळपास १२२क्लाउड किचन किचन आहेत. कोरोना नंतर शहर पूर्व पदावर येत असताना क्लाउड किचन मोठ्या प्रमाणात वाढले आहेत, तसेच 2021 नंतर शहरात घरे घेणार्‍यांचे प्रमाण वाढले असून वर्क फ्रॉम होममुळे घरगुती पद्धतीने बनविलेले जेवण मागविणार्‍यांची संख्या वाढली आहे. क्लाउड किचनला मागणी वाढत आहे'
-व्यावसायिक, निगडी

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news