जि.प. प्रभागरचनेची अधिसूचना आज निघणार; गट, पंचायत समिती गणांबाबत निर्णय | पुढारी

जि.प. प्रभागरचनेची अधिसूचना आज निघणार; गट, पंचायत समिती गणांबाबत निर्णय

पुणे  पुढारी वृत्तसेवा

जिल्हा परिषद गट आणि पंचायत समिती गणांच्या प्रारूप प्रभागरचनेला विभागीय आयुक्तांनी मंजुरी दिली, तर गुरुवारी (दि.2) जिल्हाधिकारी प्रारूप प्रभागरचनेची अधिसूचना प्रसिद्ध करतील.

जिल्ह्यात पुणे जिल्हा परिषदेमध्ये 82 गट आणि पंचायत समितीचे 164 गण आहेत. राज्य निवडणूक आयोगाने 25 जिल्हा परिषद आणि 284 पंचायत समित्यांच्या निवडणुकीसाठीच्या प्रभागरचनेचा कार्यक्रम जाहीर केला.

जीएसटीची थकबाकी 15 हजार कोटी; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माहिती; केंद्राने रक्कम द्यावी

जिल्हाधिकारी कार्यालयात हरकती व सूचना स्वीकारल्या जाणार असून, त्यांच्यावर 22 जूनपर्यंत सुनावणी घेतली जाणार आहे. तर 27 जून रोजी जिल्हाधिकारी अंतिम प्रभाररचनेचे राजपत्र प्रसिद्ध करणार आहेत.

सोयीची रचना…

प्रारूप आराखडे जिल्हाधिकारी यांच्याकडे येणार्‍यापूर्वीच व्हायरल झाले होते. काही स्थानिक आमदारांनी कार्यकर्त्यांसाठी सोयीची प्रभागरचना केल्याची चर्चा होती.

हेही वाचा

सांगलीत बनावट नोटांचा कारखाना

सिंधुदुर्ग : खोटले धनगरवाडी सड्यावर ३५ हून अधिक कातळशिल्पे सापडली

नगर : पाण्याच्या वादातून कोयत्याने वार, गुन्हा दाखल

Back to top button