नगर : पाण्याच्या वादातून कोयत्याने वार, गुन्हा दाखल | पुढारी

नगर : पाण्याच्या वादातून कोयत्याने वार, गुन्हा दाखल

नगर : पुढारी वृत्तसेवा

नळाचे पाणी भरण्याची मोटार बंद केल्याच्या कारणावरून दोन कुटुंबात झालेल्या वादात कोयत्याने वार करण्यात आला. खलील सय्यद असे हल्ल्यातील जखमीचे नाव आहे. या प्रकरणी कोतवाली पोलिस ठाण्यात 7 जणांवर जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गोविंदानंद सरस्वती दाव्यावर ठाम ; म्हणे, हनुमानाचे जन्मस्थळ ‘किष्किंधा’च

बुधवारी भल्या सकाळीच चौपाटी कारंजा परिसरात ही घटना घडली. वसीम फारूख शेख, युसुफ फारूख शेख, कुदुस शेख, रेशमा वसीम शेख, यास्मीन युसुफ शेख, आशा फारूख शेख (सर्व रा.फरातखॉ मस्जिद चौपाटी कारंजा), आक्रम शेख (रा.मुकुंदनगर) अशी गुन्हा दाखल झालेल्या सात जणांची नावे आहेत. मारहाणीत जखमी झालेल्या खलील सय्यद यांच्या पत्नी रेश्मा खलील सय्यद यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अंजनेरी हेही हनुमानाचे जन्मस्थळ, हे सर्वांनी मान्य करावे- आचार्य गंगाधरशास्त्री पाठक

शेख-सय्यद कुटुंब शेजारी-शेजारी राहतात. त्यांच्यात पाणी भरण्याच्या कारणावरून वाद झाला. सय्यद कुटुंब हे वसिम फारूख शेख यांच्या मोटारने पाणी भरतात. दरम्यान बुधवार (दि.1) रोजी सकाळच्या सुमारास पिण्याचे पाणी भरावयाचे असल्याने मोटार का बंद केली अशी विचारणा खलील सय्यद यांनी रेशमा वसीम शेख यांना केली. त्यावरून खलील सय्यद व शेख कुटुंबियामध्ये वाद सुरू झाले. त्याचे पर्यावसन मारहाणीत झाले.

Sangali: कुपवाडमध्ये तरुणावर कोयत्याने हल्ला; दोघांविरोधात गुन्हा दाखल

युसुफ शेख, आक्रम शेख, कुदुस शेख या तिघांनी लाकडी दांडक्याने मारहाण केली. वसीम फारूख शेख याने कोयत्याने पाठीवर, कमरेवर वार केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. खलील सय्यद हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर जिल्हा शासकिय रूग्णालयात उपचार सुरू आहेत.

 

Back to top button