रुपाली चाकणकर यांना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या तरुणाला पोलिसांनी घेतलं ताब्यात | पुढारी

रुपाली चाकणकर यांना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या तरुणाला पोलिसांनी घेतलं ताब्यात

पुणे :

महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या तरुणाला सिंहगड रस्ता पोलिसांनी ताब्यात घेतल. संशयिताला आज न्यायालयात हजर करण्यात येणार असल्याचं समजत आहे.

महाड : पतीच्या त्रासाला कंटाळून तिने घेतला ६ मुलांचा जीव; पतीविरूद्ध गुन्हा दाखल

भाऊसाहेब नारायण शिंदे ( रा. भेंडा, तालुका नेवासे, जिल्हा : अहमदनगर) असे त्या संशयित आरोपीचे नाव आहे. सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. रुपाली चाकणकर यांचे बंधू संतोष बोराटे (रा. हडपसर, पुणे) यांनी सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती.

मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी एकनाथ खडसेंना ईडीची नोटीस

Back to top button