आण्यात विज पडून बारा शेळ्यांचा मृत्यू | पुढारी

आण्यात विज पडून बारा शेळ्यांचा मृत्यू

आळेफाटा : पुढारी वृत्तसेवा

वीज पडल्याने गुळुंचवाडी (ता. जुन्नर) येथील ठाकर वस्तीवरील धोंडिबा कोतवाल यांच्या बारा शेळ्यांचा मृत्यू झाला. ही घटना बुधवारी १ जून रोजी घडली. धोंडिबा कोतवाल व त्यांची पत्नी कमल हे बुधवारी सकाळी दहा वाजता शेळ्या चारण्यासाठी आणे शिवारात गेले होते. दुपारी तीन नंतर अचानक मेघगर्जनेसह पावसाला सुरुवात झाली.

पुण्यातील दोन जवानांचा मरपल्लीत एकमेकांवर गोळीबार; दोघेही ठार

पावसामुळे शेळ्यांनी निवाऱ्यासाठी एका करवंदीच्या वेलीचा आसरा घेतला. त्याचवेळी विज पडून धोंडिबा कोतवाल यांच्या आठ आणि शिवाजी कोतवाल यांच्या चार अशा एकूण बारा शेळ्या मृत्युमुखी पडल्या. शेळ्यांच्या शेजारीच झाडाखाली बसलेल्या कमल कोतवाल यांनाही विजेचा धक्का बसला. कोतवाल यांचे कुटुंब आर्थिकदृष्ट्या गरीब असून ते मोलमजुरी करून आपला उदरनिर्वाह करीत आहे. शेळ्या मृत्युमुखी पडल्याने त्यांच्यावर संकट ओढवले आहे. त्यामुळे प्रशासनाने तात्काळ नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते संतोष आग्रे यांनी केली आहे.

Back to top button