पुणे : डिंभे कालवा अस्तरीकरणाचे काम ग्रामस्थांनी पाडले बंद | पुढारी

पुणे : डिंभे कालवा अस्तरीकरणाचे काम ग्रामस्थांनी पाडले बंद

मंचर : पुढारी वृत्तसेवा

डिंभे उजवा तीर कालव्याचे अस्तरीकरणाचे काम मंचर परिसरात सुरू आहे. कालव्यातील पाण्याचा पाझर बंद झाल्याने मंचर शहरातील पाण्याच्या विहिरी, हातपंप, बोअरवेल यांचे पाणी कमी झाले आहे. त्यामुळे शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख सुरेश भोर व राष्ट्रवादीचे प्रशांत बागल यांच्या नेतृत्वाखाली मंचर ग्रामस्थांनी कालवा अस्तरीकरणास विरोध करत मंगळवारी (दि. 31) काम बंद पाडले.

गडचिरोली : ७५ वर्षीय वृद्धेचा उष्माघाताने मृत्यू

या वेळी सुरेश भोर म्हणाले, मंचरची लोकसंख्या अधिक आहे. कालव्याचे सिमेंट अस्तरीकरण झाल्यास भविष्यात पिण्याच्या व शेतीसाठीच्या पाण्याची टंचाई जाणवण्याची शक्यता आहे. पूर्वी मंचर येथे हॉटेल व बाजारात नागरिकांना पाणी विकत घ्यावे लागत होते. शहराची आताची व तरंगती लोकसंख्या विचारात घेता प्रशासन पाणी पुरविण्यास असमर्थ ठरेल. या भागातील विहिरी, विंधन विहिरी यांचे पाणी कमी होण्याची शक्यता आहे.

मोबाईलवर ‘हॉरर’ व्हिडिओ पाहिला; नंतर बाहुलीला फाशी देऊन चिमुरड्याने घेतला गळफास, पिंपरीतील धक्कादायक घटना

मंचरमध्ये अनेक गृहप्रकल्प झाले आहेत. त्यांना आताच पाणी मिळत नाही. कालवा अस्तरीकरणामुळे भविष्यात त्यांना पाणी मिळणार नाही. ज्या तालुक्यात डिंभे धरण आहे, ज्या शेतकर्‍यांच्या प्रकल्पासाठी व कालव्यासाठी जमिनी गेल्या त्या शेतकर्‍यांना पाणी मिळाले नाही तर त्यांच्यावर अन्याय होईल. तसेच या भागातील अर्थव्यवस्था कोलमडून जाईल. मंचर व परिसर पुन्हा दुष्काळाच्या छायेत जाईल. जेथे सिमेंट अस्तरीकरणाचे काम झाले आहे तेथे पिण्याच्या पाण्याची व शेतीच्या पाण्याची गैरसोय झाली आहे. अशी स्थिती मंचरमध्ये उद्भवू नये म्हणून स्मशानभूमी ते मोरडे कॅटबरी कारखान्यापर्यंतचे कालवा अस्तरीकरणाचे काम बंद केले आहे. या वेळी उद्योजक प्रशांत बागल, विशाल मोरडे, संदीप मोरडे, समीर मोरडे, मनोज घुले, गणेश घुले, विशाल घुले, रमेश पिंगळे आदी उपस्थित होते.

हेही वाचा

अंजनेरी हेही हनुमानाचे जन्मस्थान : आचार्य गंगाधर पाठक

PMJJBY-PMSBY : केंद्राने पीएम जीवन ज्योती आणि सुरक्षा विमा योजनेचा प्रीमियम वाढवला, जाणून घ्या नवे दर

पूरग्रस्तांच्या हक्कासाठी भाजपचा कोल्हापुरात टाहो मोर्चा (video)

Back to top button