वडगाव शेरी : सर्वसाधारण खुल्या जागेमुळे मुळीक, पठारे, टिंगरे, धेंडे यांचा मार्ग सुकर

वडगाव शेरी : सर्वसाधारण खुल्या जागेमुळे मुळीक, पठारे, टिंगरे, धेंडे यांचा मार्ग सुकर
Published on
Updated on

पुणे : पुढारी वृत्तसेवा

वडगाव शेरी मतदारसंघात प्रामुख्याने अनुसुचित जाती महिला आरक्षणामुळे शिवसेनेचे अविनाश साळवे, भाजपचे राहूल भंडारे, नाना सांगडे आणि राष्ट्रवादीचे भैय्यासाहेब जाधव चार माजी नगरसेवकांना फटका बसला आहे. तर प्रत्येक प्रभागात सर्वसाधारण खुल्या  जागेमुळे या मतदारसंघातील मुळीक, पठारे, टिंगरे, धेंडे या सर्वंच दिग्गजांच्या लढतीचा मार्ग मोकळा झाला आहे.

वडगाव शेरी विधानसभात मतदारसंघात एकूण 9 प्रभाग येत असून यामधील पुर्व खराडी – वाघोली हा प्रभाग क्र. 4 मधील वाघोलीचा परिसर शिरुर-हवेली या मतदारसंघातील आहे. जवळपास सर्व दिग्गज इच्छुकांचा मार्ग मोकळा झाला आहे. प्रभाग क्र. 1 धानोरी- विश्रांतवाडी या प्रभागातील एक जागा खुल्या गटासाठी असल्याने राष्ट्रवादीच्या रेखा टिंगरे, भाजपचे अनिल टिंगरे तर अनुसुचित जाती आरक्षणामुळे ऐश्वर्या जाधव या तिघांचाही लढण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

यांचाही  मात्र अनुसुचित जमाती महिला आरक्षणामुळे नाना सांगडे यांचा पत्ता आता कट होणार असल्याचे स्पष्ट आहे. प्रभाग क्र. 2 टिंगरेनगरमध्ये दोन महिला आणि एक सर्वसाधारण यामुळे विद्यमान आमदार सुनिल टिंगरे यांचे बंधू सुहास टिंगरे यांची उमेदवारी निश्चित मानली जात आहे. आता उर्वरीत दोन जागांवर आमदार नक्की कोणाला संधी देणार याबाबत उत्सुकता आहे. प्रभाग क्र. 3 लोहगाव-विमानगरमध्ये एससी महिलेचे आरक्षण पडल्याने माजी नगरसेवक राहूल भंडारे यांच्या ऐवजी आता त्यांच्या पत्नीला निवडणूकीत उतरावे लागेल. तर उर्वरीत एक जागा महिला व एक जागा खुली झाल्याने लोहगावमधील अनेक इच्छुकांमध्ये रस्सीखेच होणार आहे.

प्रभाग क्र. 4 : पुर्व खराडी-वाघोलीमध्ये एससी महिला आरक्षणामुळे राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक भैय्यासाहेब जाधव यांची उमेदवारी अडचणीत आली आहे. उर्वरीत दोन जागांपैकी एक सर्वसाधारण महिला आणि एक साधारण जागा असल्याने खराडीतील पठारे भावकितील व वाघोलीतील कटके, सातव या इच्छुकांनाही संधी उपलब्ध झाली आहे.

प्रभाग क्र. 5 : पश्चिम खराडी- चंदननगर या प्रभागात दोन जागा सर्वसाधारणसाठी खुल्या झाल्याने माजी आमदार बापुसाहेब पठारे कुंटुंबातील उमेदवारीवरून होणारा राजकिय संघर्ष टळणार आहे. पठारे यांचे चिरंजीव सुरेंद्र आणि पुतणे माजी नगरसेवक महेंद्र पठारे हे दोघेही एकमेकांसमोर न येता निवडणूकीत उतरू शकणार आहेत. या प्रभागातील एक जागा महिलेसाठी आरक्षित झाली असून त्यावर आता राष्ट्रवादीकडून माजी नगरसेविका सुमन पठारे, उषा कळमकर, भाजपकडून श्वेता गलांडे, मुक्ता जगताप इच्छुक आहेत.

प्रभाग क्र. 6 : वडगाव शेरी या प्रभागात दोन जागा सर्वसाधारण झाल्याने याठिकाणी इच्छुक असलेले माजी नगरसेवक संदिप जर्‍हाड, योगेश मुळीक, सचिन भगत यांनाही आता संधी मिळणार आहे. तर महिला आरक्षित एका जागेवर माजी नगरसेविका सुनिता गलांडे, शितल शिंदे या भाजपच्या दोघेही पैकी एकिच्या उमेदवारीची अडचण होणार आहे.

प्रभाग क्र. 7 : कल्याणीनगर-नागपुर चाळ या प्रभागात अनुसुचित जातीच्या आरक्षणामुळे माजी उपमहापौर डॉ. सिध्दार्थे धेंडे, तर सर्वसाधारण जागेवर भाजपचे योगेश मुळीक अथवा बापुराव कर्णे गुरुजी यांना तर सर्वसाधारण महिलेच्या जागेवर मीनल सरवदे, संगिता देवकर यांना निवडणूक लढविता येणार आहे.

प्रभाग क्र-8 : कळस- फुलेनगर या प्रभागात अनुसुचित जाती, सर्वसाधारण महिला आणि सर्वसाधारण अशी आरक्षणे असून त्यामुळे माजी नगरसेविका शितल सावंत, सतिश म्हस्के, फरझाना शेख, सुनिल गोगले, यांचाही मार्ग सुकर झाला आहे.

प्रभाग क्र. 9 : मध्ये येरवडा या प्रभागात अनुसुचित जाती महिला आरक्षणामुळे अविनाश साळवे यांची अडचण होणार आहे. तर सर्वसाधारण महिला व साधारण जागेमुळे संजय भोसले, श्वेता चव्हाण, आश्विनी लांडगे यांनाही पुन्हा निवडणूकीच्या रिंगणात उतरता येणार आहे. एकंदरीतच केवळ एसी व एसटी आरक्षणाचा अपवाद वगळता सर्व प्रभागात इच्छुकांना लढण्याची संधी कायम राहीली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news