‘ग्रामसुरक्षा’ने रोखले साडेतीन हजार गुन्हे | पुढारी

‘ग्रामसुरक्षा’ने रोखले साडेतीन हजार गुन्हे

सोलापूर : अमोल व्यवहारे :  ‘गाव करील ते राव करील काय’ या म्हणीप्रमाणे गावांच्या पुढाकारानेच शासन पातळीवर ग्रामसुरक्षा यंत्रणा उभारण्यात आली. ‘सहाय्यम् सर्वतो सहस्रशः’ या ब्रीदनुसार ‘आपले गाव, आपली सुरक्षा’ संकल्पनेतून सन 2012 पासून राज्यात सोलापूर, पुणे, अहमदनगर व उस्मानाबाद या चार जिल्ह्यांमध्ये टप्प्याटप्प्याने प्रायोगिक तत्त्वावर ग्रामसुरक्षा यंत्रणा सुरू आहे. यामध्ये तब्बल सध्या 38 लाख कुटुंबे सहभागी आहेत. या यंत्रणेचा वापर करून सुमारे 3500 गुन्हे रोखण्यात नागरिकांबरोबरच पोलिस प्रशासनाला यश आले आहे. हा प्रकल्प संपूर्ण राज्यात राबविल्यास गावातच ‘गुन्हेगारीमुक्त’ गाव होण्यास मदत मिळणार आहे.

सन 2012 मध्ये अहमदनगर जिल्ह्यातील पिंपळगाव निपाणी (ता. अकोले) या गावात प्रायोगिक तत्त्वावर याच गावातील रेल्वेतील अभियंता दत्तात्रय गोर्डे यांनी ही ग्रामसुरक्षा यंत्रणा तयार केली. टप्प्याटप्प्याने ही यंत्रणा आता अहमदनगर, पुणे, उस्मानाबाद, सोलापूर जिल्ह्यात पूर्णपणे कार्यरत असून नाशिक आणि  सातारा जिल्ह्यातील काही तालुक्यांमध्ये कार्यरत आहे. सध्या 4500 गावांमधील सुमारे 38 लाख कुटुंब ग्रामसुरक्षा यंत्रणेत सहभागी असून सुमारे 2 ते 3 कोटी लोक थेट संपर्कात आहेत.

सोलापूर जिल्ह्यातही ग्रामसुरक्षा यंत्रणा जुलै 2021 पासून कार्यान्वित करण्यात आली. सध्या यात सोलापूर जिल्ह्यातील 1097 गावांमधील 8574 सदस्य कार्यरत आहेत. ग्रामसुरक्षा दलाच्या सतर्कतेमुळे जिल्ह्यातील अनेक गुन्हेगारी कारवायांना पायबंद घालण्यात सोलापूर ग्रामीण पोलिसांना यश आले आहे. सुरक्षेच्यादृष्टीने 763 गावांमध्ये मंदिरावर सायरन व 263 गावांमध्ये सीसीटीव्ही बसविण्यात आले आहेत.

संकटकाळात स्वतःच्या मोबाईलवर सर्व गावकर्‍यांना एकाच वेळी कॉलच्या माध्यमातून सूचना देणे, सावध करणे किंवा मदतीला बोलावण्यासाठी ही यंत्रणा उपयुक्त आहे. पोलिस ठाणे व ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने आपल्या गावात मालमत्तेसंदर्भात व शरीराविरुध्द होणार्‍या गुन्ह्यांना आळा घालण्याकरिता ग्रामसुरक्षा यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे. या यंत्रणेद्वारे तब्बल 350 हून अधिक गंभीर स्वरूपाचे गुन्हे रोखण्यात पोलिसांना यश आले आहे. एवढेच नव्हे तर फरार गुन्हेगारही हाती लागू शकले आहेत.
ग्रामसुरक्षा यंत्रणेमुळे गावाची सुरक्षा होतेच याशिवाय गुन्हा होण्यापूर्वीच त्याला अटकाव करण्यात यश येत आहे. ग्रामसुरक्षा यंत्रणेतील सदस्यांचा उपयोग पोलिस प्रशासन हे आपत्कालीन परिस्थितीमध्ये करण्याबरोबरच आषाढी, कार्तिकी, चैत्र आणि माघ वारीमध्येही करुन घेतला जात आहे.

ग्रामसुरक्षा यंत्रणा कशी सुरू करतात

प्रत्येक गावात पोलिस ठाण्याकडून ग्रामसुरक्षा यंत्रणा सुरू करण्यात येत आहे. स्थानिक पोलिस ठाण्यात गावचे सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, पोलिस पाटील, तंटामुक्ती अध्यक्ष व गावातील सामाजिक कार्यकर्ते यांची एकत्रित सभा घेऊन ग्रामसुरक्षा यंत्रणेचे प्रात्यक्षिक देण्यात येते. ज्या गावात ग्रामसुरक्षा यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे त्या गावातील प्रत्येक नागरिक ग्रामसुरक्षा यंत्रणेत सहभागी होऊ शकतो.

ग्रामसुरक्षा यंत्रणा कशी वापरावी

संकटकाळात परिसरातील नागरिकांना सावध करणे किंवा त्यांची मदत करण्यासाठी 18002703600 या टोल फ्री नंबरवर कॉल करावा. यंत्रणा पूर्णपणे स्वयंचलित आहे. कॉल करताना स्वतःचे नाव, घटनेचे ठिकाण, घटनेचे स्वरूप स्पष्ट शब्दांत नागरिकांना समजेल, अशा पध्दतीने सांगावे. संदेश 25 सेकंदापेक्षा मोठा नसावा. यंत्रणेद्वारे कॉल करुन संदेश पध्दतीने व नियमानुसार दिलेला असेल तर 1 ते 3 मिनिटांत सर्व ग्रामस्थांना संदेश मिळालेला असतो. ग्रामसुरक्षा यंत्रणेद्वारे कॉल कसा करावा याच्या सरावासाठी 9595084943 या नंबरवर कॉल करुन सराव करता येतो. या नंबरवर केलेला कॉल गावात प्रसारित न होता स्वतःच्या फोनवर तत्काळ मिळतो. प्रत्यक्ष संकटसमयी मात्र 18002703600 या टोल फ्री नंबरवर कॉल करावा लागेल. ग्रामसुरक्षा यंत्रणेद्वारे संदेश परिसरातील नागरिकांना घटना सांगणार्‍या व्यक्तीच्या आवाजातच कॉल स्वरूपात जातो. वाहन चोरीचा संदेश एसएमएसद्वारे 10 कि.मी. परिसरातील गावांनाही जातो. ग्रामसुरक्षा यंत्रणेस 365 दिवसांतील 24 तास केव्हाही कॉल करू शकता, वेळेचे बंधन नाही.

सातारा जिल्ह्यातील काही तालुक्यांमध्ये कार्यरत आहे. सध्या 4500 गावांमधील सुमारे 38 लाख कुटुंब ग्रामसुरक्षा यंत्रणेत सहभागी असून सुमारे 2 ते 3 कोटी लोक थेट संपर्कात आहेत.

सोलापूर जिल्ह्यातही ग्रामसुरक्षा यंत्रणा जुलै 2021 पासून कार्यान्वित करण्यात आली. सध्या यात सोलापूर जिल्ह्यातील 1097 गावांमधील 8574 सदस्य कार्यरत आहेत. ग्रामसुरक्षा दलाच्या सतर्कतेमुळे जिल्ह्यातील अनेक गुन्हेगारी कारवायांना पायबंद घालण्यात सोलापूर ग्रामीण पोलिसांना यश आले आहे. सुरक्षेच्यादृष्टीने 763 गावांमध्ये मंदिरावर सायरन व 263 गावांमध्ये सीसीटीव्ही बसविण्यात आले आहेत.

संकटकाळात स्वतःच्या मोबाईलवर सर्व गावकर्‍यांना एकाच वेळी कॉलच्या माध्यमातून सूचना देणे, सावध करणे किंवा मदतीला बोलावण्यासाठी ही यंत्रणा उपयुक्त आहे. पोलिस ठाणे व ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने आपल्या गावात मालमत्तेसंदर्भात व शरीराविरुध्द होणार्‍या गुन्ह्यांना आळा घालण्याकरिता ग्रामसुरक्षा यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे. या यंत्रणेद्वारे तब्बल 350 हून अधिक गंभीर स्वरूपाचे गुन्हे रोखण्यात पोलिसांना यश आले आहे. एवढेच नव्हे तर फरार गुन्हेगारही हाती लागू शकले आहेत.
ग्रामसुरक्षा यंत्रणेमुळे गावाची सुरक्षा होतेच याशिवाय गुन्हा होण्यापूर्वीच त्याला अटकाव करण्यात यश येत आहे. ग्रामसुरक्षा यंत्रणेतील सदस्यांचा उपयोग पोलिस प्रशासन हे आपत्कालीन परिस्थितीमध्ये करण्याबरोबरच आषाढी, कार्तिकी, चैत्र आणि माघ वारीमध्येही करुन घेतला जात आहे.

रेल्वेतील नोकरी सोडून केली यंत्रणा उभारणी

ग्रामसुरक्षा यंत्रणा ही रेल्वे विभागात अभियंता म्हणून कार्यरत असलेल्या डी.के. गोर्डे यांनी निर्माण केली आहे. सन 2008 मध्ये अहमदनगर जिल्ह्यात झालेल्या एका दरोड्याच्या गुन्ह्यातील घटनेने व्यथित झालेल्या गोर्डे यांनी रेल्वे विभागातील नोकरी सोडून ग्रामीण भागातील जनतेच्या संरक्षणासाठी काय करता यईल, याचा विचार करीत ही ग्रामसुरक्षा यंत्रणा तयार केली. अनेक पोलिस ठाण्यांनी ही यंत्रणा गावांना दिली. त्यातून अनेक गुन्हे वेळीच रोखले गेले आहेत.

काही चोर ग्रामस्थांनीच रंगेहात पकडून दिले. ज्या घरात चोरी होत आहे किंवा जे घर संकटात आहे, तेथील व्यक्ती या टोल फ्री क्रमांकावर आपल्या आवाजात हा संदेश क्षणात सर्वांना देऊ शकते. याच यंत्रणेने नाशिक जिल्ह्यातील पुराची खबर गावोगावच्या नागरिकांना मोबाईलवर कळविली व गावे सावध झाली. परंतु कोल्हापूर, सांगलीत मात्र सांगूनही ही यंत्रणा वापरली गेली नाही. त्यामुळे कोल्हापूर आणि सांगलीमध्ये पुरामध्ये अतोनात नुकसान झाल्याचे गोर्डे यांचे म्हणणे आहे.

गुन्हे प्रतिबंध करण्यासाठी यंत्रणेचा वापर

आपल्याकडे शरीराविषयक किंवा मालाविषयक गुन्हे घडल्यानंतर पोलिस यंत्रणा घटनास्थळी येते व पंचनामा करते. पोलिस यंत्रणेचा वापर हा केवळ गुन्हे घडल्यानंतरच होतो. गुन्हे घडताना किंवा गंभीर गुन्हा घडू नये म्हणून प्रतिबंधक यंत्रणा म्हणून होत नाही. परंतु ग्रामसुरक्षा यंत्रणेच्या वापरामुळे गंभीर गुन्हे करणार्‍या गुन्हेगारांना जागेवरच पकडण्यात ग्रामस्थांना व पोलिस यंत्रणेला यश येत आहे.

Back to top button