पिंपरी चिंचवड महापालिका आरक्षण सोडत जाहीर: माजी नगरसेवकांना मोठा धक्का, तुमचा वॉर्ड कोणासाठी आरक्षित? | पुढारी

पिंपरी चिंचवड महापालिका आरक्षण सोडत जाहीर: माजी नगरसेवकांना मोठा धक्का, तुमचा वॉर्ड कोणासाठी आरक्षित?

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा

पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीसाठी राज्य निवडणूक आयोगाने आरक्षण सोडत जाहीर केली आहे. पिंपरी महापालिकेत नगरसेवकांची संख्या 139 असून एकूण 46 प्रभागांसाठी ही आरक्षण सोडत काढण्यात आली. या सोडतीमध्ये महिला जागा राखीव झाल्याने बर्‍याच माजी नगरसेवकांना धक्का बसला असून, खुल्या गटात तुल्यबळ लढत अपेक्षित आहे.

रुपालीताईंना धमकी देणारा गजाआड; आरोपी म्हणतोय कुटुंबावर सॅटेलाईटचा वॉच!

महापालिकेचे आयुक्त तथा प्रशासक राजेश पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आरक्षण सोडतीला चिंचवडच्या प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात सकाळी अकराला सुरूवात झाली. या वेळी अतिरिक्त आयुक्त जितेंद्र वाघ, उल्हास जगताप, उपायुक्त विठ्ठल जोशी, सचिन ढोले, सहायक आयुक्त बाळासाहेब खांडेकर, प्रशांत जोशी, अण्णा बोदडे तसेच, विविध पक्षाचे शहराध्यक्ष, माजी नगरसेवक व इच्छुक आदी उपस्थित होते. पारदर्शक काचेच्या डॅममध्ये चिठ्ठया टाकून त्या शालेय विद्यार्थ्यांच्या हस्ते काढण्यात आल्या. एकूण 70 जागांवरील महिलांचे चित्र स्पष्ट झाले.

Back to top button