पुतीन यांचा मृत्‍यू ?; खुर्चीवर त्‍यांचा बहुरूपी : ब्रिटनच्या गुप्तचर यंत्रणेचा दावा | पुढारी

पुतीन यांचा मृत्‍यू ?; खुर्चीवर त्‍यांचा बहुरूपी : ब्रिटनच्या गुप्तचर यंत्रणेचा दावा

लंडन ; वृत्तसंस्था : रशियन राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांचा कर्करोगासारख्या गंभीर आजारात मृत्यू झाला आहे आणि युक्रेनविरोधी युद्धाच्या पार्श्वभूमीवर त्यांचा डुप्लिकेट बसवला आहे, अशी दाट शक्यता ब्रिटनच्या ‘एमआय 6’ या गुप्तचर यंत्रणेने वर्तविली आहे. या दाव्याने जगभरात खळबळ उडाली आहे.

रशियाने युक्रेनविरुद्ध पुकारलेले युद्ध अद्याप सुरू आहे. त्यामुळे पुतीन यांचा मृत्यू झाल्याचे जाहीर केल्यास रशियाला मोठा फटका बसू शकतो. म्हणून युद्धकाळात व्लादिमीर पुतीन यांच्या मृत्यूची बातमी दडविण्यासाठी त्यांच्या ‘बॉडी डबल’चा वापर केला जात आहे, असे या गुप्तचर संघटनेने म्हटले आहे. ब्रिटनच्या ‘मिरर’ या वेबसाईटने ‘द डेली स्टार’च्या हवाल्याने हे वृत्त दिले आहे. पुतीन 69 वर्षांचे आहेत आणि त्यांना रक्ताचा कर्करोग आहे.

युक्रेनसोबत युद्धाच्या पार्श्वभूमीवर पुतीन व्हिडीओच्या माध्यमातून समोर आले होते, पण तेव्हा त्यांचा चेहरा सुजलेला दिसत होता. गुप्तचर संघटनेच्या मते हा व्हिडीओही जुना आणि आधीच रेकॉर्ड करून ठेवल्याची शक्यता अधिक आहे. रशियाच्या विजय दिनी मॉस्कोत दिसलेले पुतीन म्हणजे त्यांचा ‘बॉडी डबल’ असू शकतो.

Back to top button