खरीपासाठी शेतकऱ्यांना खते, बि-बियाणे पुरवठ्यात सातत्य राहील – उपमुख्यमंत्री अजित पवार यांची हमी | पुढारी

खरीपासाठी शेतकऱ्यांना खते, बि-बियाणे पुरवठ्यात सातत्य राहील - उपमुख्यमंत्री अजित पवार यांची हमी

बारामती : पुढारी वृत्तसेवा

राज्यात खरीप हंगामात शेतकऱ्यांना खते, बि-बियाणे कमी पडणार नाहीत, अशी हमी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. बारामतीत ते पत्रकारांशी बोलत होते.  पवार म्हणाले, खरीप हंगाम सुरु होण्यापूर्वीच राज्य शासनाने खते, बियाणे यासंबंधीची आवश्यक ती व्यवस्था केलेली आहे.

स्टार्ट-अपसाठी मार्गदर्शन खूपच महत्वाचे : नरेंद्र मोदी

त्यामुळे शेतकऱ्यांना कोणतीही अडचण येणार नाही. राज्याच्या स्तरावर मुख्यमंत्र्यांच्या तर पुणे विभागीय स्तरावर माझ्यासह कृषिमंत्री दादा भुसे यांनी बैठका घेवून आढावा घेतला आहे. कृषि विभागाशी समन्वय साधून किती खते कमी पडतील, त्याची मागणी नोंदवली आहे. त्यादृष्टीने ती उपलब्ध कोठून होतील, याचाही विचार झालेला आहे.

पुणे : पेट्रोल अंगावर टाकून पत्नीला पेटविले; खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी पती अटकेत

शेतकऱ्यांना या बाबींची कोणतीही कमतरता भासणार नाही, याबाबतचे नियोजन राज्य शासनाने केले आहे. कोरोनाच्या नव्या व्हेरियंटने चिंता निर्माण केल्याच्या प्रश्नावर ते म्हणाले, याविषयी राज्याच्या आरोग्य विभाग आवश्यक ती खबरदारी घेत आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे हे सातत्याने या विषयावर लक्ष ठेवून आहेत.

IPL Final : गुजरातच्या मोहम्मद शमीकडे ‘शतक’ झळकावण्याची संधी!

ज्या काही बातम्या येत आहेत, त्या अनुषंगाने त्यात किती तथ्य आहे याची चौकशी आरोग्य विभागाच्या तज्ज्ञांना करायला सांगितली आहे. मी सोमवारी मुंबईत गेल्यानंतर यासंबंधीची अधिक माहिती घेईन. बाब गंभीर असेल तर त्याची संपूर्ण माहिती राज्यातील जनतेला दिली जाईल.

Back to top button