हर्षवर्धन सदगीर आणि महिलांमध्ये रेश्मा मानेने पटकावली मानाची गदा | पुढारी

हर्षवर्धन सदगीर आणि महिलांमध्ये रेश्मा मानेने पटकावली मानाची गदा

नगर : पुढारी वृत्तसेवा

छत्रपती शिवराय राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेत पुरुषांमध्ये मानाची गदा नाशिकचा महाराष्ट्र केसरी पैलवान हर्षवर्धन सदगीर, महिलांमध्ये कोल्हापूरची रेश्मा माने यांनी पटकावली. हर्षवर्धन आणि शुभम शिजनाळे यांची कुस्ती प्रेक्षणीय ठरली. या अटीतटीच्या कुस्तीत शेवटच्या क्षणी हर्षनर्धने दोन गुण मिळवत विजयश्री खेचून आणली.

अहमदनगर जिल्हा तालीम संघ व किरण काळे युथ फाउंडेशतर्फे छत्रपती शिवराज राज्यस्तरीय निमंत्रित कुस्ती स्पर्धेचे आयोजन केले होते. या कुस्ती स्पर्धेत विविध वजनी गटाच्या अंतिम कुस्त्या सायंकाळी लावण्यात आल्या. या कुस्त्या पाहण्यासाठी प्रेक्षकही मोठ्या प्रमाणात आले होते. महिलांची संख्याही लक्षणीय होती. शेवटची मानाची छत्रपती शिवराय कुस्ती महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, क्रीडा मंत्री सुनील केदार, महाराष्ट्र कुस्ती परिषदेचे काका पवार, अहमदनगर जिल्हा तालीम संघाचे अध्यक्ष वैभव लांडगे, पै. नाना डोंगरे यांच्या उपस्थित लावण्यात आली.

शिवसेना नेते संजय राऊत यांची डॉ. प्रतापसिंह जाधव यांच्याशी चर्चा

नाशिकचा महाराष्ट्र केसरी हर्षवर्धन सदगीर व महानभारत केसरी शुभम शिजनाळे यांच्या ही कुस्ती लावण्यात आली. या कुस्तीत मध्यंतराच्या काही वेळ अधी हर्षवर्धनने शुभमला मैनाच्या बाहेर काढत एक गुण घेऊन 1-0 अशी आघाडी घेतली. मध्यंतरानंतर बराच वेळ दोन्ही मल्लांनी गुण घेतला नसल्याने पंचांनी गुण घेण्यास सांगितले. अटीतटीच्या या कुस्तीत हर्षवर्धने दोन गुण घेऊन 3-0 अशी आघाडी घेतली. यावेळी शुभमने गुण घेण्यासाठी मोठे प्रयत्न केले; मात्र त्याला शेवटपर्यंत एकही गुण घेता आला नाही.

शेवटच्या क्षणी हर्षवर्धनने पुन्हा एक गुण घेत 4-0 अशा गुणांनी ही कुस्ती निकाली काढली. यावेळी प्रेक्षकांनी एकच जल्लोष केला. तत्पूर्वी  महिलांची शेवटची कुस्ती कोल्हापूरी शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार विजेती रेशमा माने व सांगलीची प्रतीक्षा बागडे यांच्यात झाली. रेशमा माने हिने पहिल्यापासूनच अघाडी घेतली होती. मध्यंतरात दोन्ही मल्लांनी 1-1 अशी बरोबरी साधली होली होती. यानंतर रेश्मा माने हिने खेळातील चपळाई दाखवत एक गुण घेतला. पुन्हा दोन्ही मल्लांनी 3-3 अशी बरोबरी साधली. प्रेशक्षांची उत्कंठा लागलेली ही कुस्ती रेशमा माने हिने शेवटच्या क्षणाला एक गुण घेत 4-3 अशा गुणांनी जिंकल मानकरी ठरली.

पश्चिम महाराष्ट्राप्रमाणे विदर्भातही नंदनवन फुलावे : ना. जयंत पाटील

यावेळी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, क्रीडा मंत्री सुनील केदार, आमदार डॉ. सुधीर तांबे, आमदार लहू कानडे, काका पवार, वैभव लांडगे, योगेश दोडके, हर्षवर्धन कोतकर आदी उपस्थित होते. मनोज गुंदेचा यांनी प्रास्ताविक केले. मंत्री केदार म्हणाले, हा चांगला उपक्रम आहे. पक्ष संघटनेला उपयोग होईल. यामुळे नवीन विचारधारा मिळणार आहे.

काळे बोले तैसा चाले याप्रमाणे काम करत आहेत. क्रीडा धोरणात काका पवार आपल्या सूचनांप्रमाणे बदल केली जाती. राज्यात 2019ला विधानसभा निवडणुकीत अध्यक्षपद कोणी घ्यावे, अशी परिस्थिती होती. तेव्हा थोरात यांची सूचना आली, त्यांनी स्वीकारले. मृद स्वभाव, काही तरी करून दाखविण्याची प्रवृत्ती त्यांच्यात आहे. राज्यात सर्वांना घेऊन ते चालत आहेत, ही त्यांची हातोटी आहे. राज्यात बाळासाहेब यांनी किमया केली आहे. महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, क्रीडा मंत्री सुनील केदार यांनी किरण काळे यांचे भरभरून कौतुक केले.

मंकीपॉक्सचा धोका किती?

या स्पर्धेच्या माध्यमातून नगर शहराच्या स्थापना दिनी कुस्त्यांचा फड ऐतिहासिक वाडिया पार्कच्या मैदानात रंगलेल्या या स्पर्धेची राजकीय वर्तुळात सुरुवातीपासूनच मोठी चर्चा सुरू होती. विशेष म्हणज छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने एवढी भव्य स्पर्धा शहरात प्रथमच झाली.

Back to top button