वाट चुकलेल्या चितळाचा मोकाट कुत्र्यांनी घेतला जीव. | पुढारी

वाट चुकलेल्या चितळाचा मोकाट कुत्र्यांनी घेतला जीव.

पिरंगुट : पुढारी वृत्तसेवा

वाट चुकलेल्या चितळ जातीच्या हरणाचा भुकूम (ता.मुळशी) परिसरातील स्काय आय स्टार टाउन सोसायटीच्या परिसरात असलेल्या राम नदी मध्ये मोकाट कुत्र्यांनी चावा घेऊन जीवे मारले. ही घटना गुरुवारी सकाळी घडली.

देशमुख, मलिक यांच्यानंतर आता परबांचा नंबर, अनिल परब यांच्या निवासस्थानी ईडीची छापेमारी

सकाळी चालण्यासाठी गेलेल्या परिसरातील नागरिकांना राम नदीच्या परिसरात खूपच कुत्री भुंकत असल्याचे लक्षात आले. त्या ठिकाणी पाहिले असता हे मोकाट कुत्रे हरणाचा चावा घेत असल्याचे दिसले. नागरिकांनी कुत्र्यांना हाकलून दिले. मोकाट कुत्र्यांनी हल्ला केलेले हे चितळ हरीण जखमी अवस्थेत राम नदी पात्राच्या गाळात रात्रीच्या वेळी अडकले होते.

‘सिंचन’ची आऊटसोर्सिंगमध्ये बनवेगिरी

भूकूम च्या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात हरणे येत असतात परंतु परिसरात नागरीकरण वाढले असल्याने याठिकाणी मोकाट कुत्रीसुद्धा खूपच वाढलेली आहेत यापूर्वीसुद्धा दै.’ पुढारी’ ने या मोकाट कुत्र्यांचा स्थानिक नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास होत असल्याच्या बातम्या अनेक वेळा प्रसिद्धही केल्या आहेत.

राज्यातील विधानपरिषदेच्या १० जागांसाठी निवडणूक जाहीर

स्थानिक नागरिकांनी आपत्ती व्यवस्थापन कक्षाशी संपर्क साधला असता तहसीलदार अभय चव्हाण वनविभाग अधिकारी संतोष चव्हाण, यांच्या मार्गदर्शनाखाली टिम घटनास्थळी पोहचली. त्यांनी स्थानिक नागरिकांच्या साह्याने हरणाला चिखलातुन बाहेर काढले. जवळच राहत असलेले भुगाव येथिल रेक्सु टिम चे डॉ. चेतन यांनी हरणावर प्राथमिक उपचार करायला घेतले असता, त्याचा आधीच मृत्यू झालेला असल्याचे त्यांनी सांगितले. वनविभागाच्या सारिका दराडे, अधिकारी शेलार, मुळशी आपत्ती व्यवस्थापन समितीचे प्रमोद बलकवडे यांनी हरणाला रेक्सु व्हॉनमधे ठेऊन पुढील कार्यवाही साठी भुगाव येथे पाठवण्यात आले .

Back to top button